आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २१ जून, २०२६

शैक्षणिक साहित्य आणि शालेय फीचे वाटप

भांडुप : श्री विष्णू चैतन्य गणपत महाराज मंदिर ट्रस्ट, भांडुप आणि सार्वजनिक पूजा समिती, भांडूपगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच दि. १९ जून रोजी स्व. दीना बामा पाटील रंगमंच, भांडुपगाव येथे शैक्षणिक साहित्य व शालेय फीचे वाटप संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ कामगार नेते परशुराम कोपरकर यांच्या हस्ते पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुनिल राऊत यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. 
       या संस्थेतर्फे प्रत्येक वर्षी विद्यार्थी दत्तक योजनेच्या माध्यमातून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शालेय फीचे वाटप केले जाते. यावर्षी १५० विद्यार्थ्यांना वह्या, दप्तर, गणवेश, सँडल, छत्री व शालेय फी यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला साहित्यिक प्रा. जयवंत पाटील तसेच संस्थेचे निलेश वैती, सौ. वैती, धनंजय म्हात्रे, महेश पाटील, रजनी पाटील, सोनम कोपरकर, पल्लवी खारकर, स्मिता मिसाळ, वर्षा वाघिलकर, सुदाम सुतार हेमंत वाघिलकर, महेंद्र कुरकुटे, प्रशांत काकडे, राजन गावकर, संजय उलवेकर, अशोक केणी, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालक आदि मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने उपसभापती विनोद मोरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न

मुंबई दि. २१ (रामदास धो. गमरे) बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती आणि कोकण प्रांताचे नेते विनोद सुदाम मोरे यांचा वाढदिवस १९ जून रोजी कार्याध्यक...