आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २१ जून, २०२६

बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने उपसभापती विनोद मोरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न

मुंबई दि. २१ (रामदास धो. गमरे) बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती आणि कोकण प्रांताचे नेते विनोद सुदाम मोरे यांचा वाढदिवस १९ जून रोजी कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई - १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
      सदर कार्यक्रमास कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, सरचिटणीस राजेश घाडगे यांनी महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून ज्योत प्रज्वलित केली तद्नंतर संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार, मनोहर बा. मोरे आणि श्रीधर साळवी यांनी आपल्या सुमधुर आवाजात धार्मिक पूजापाठ संपन्न केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करीत असताना सरचिटणीस राजेश घाडगे यांनी "विनोद मोरे यांनी गेली ३५ ते ४० वर्षे समितीचे कामकाज उत्कृष्ट व पारदर्शक पद्धतीने पाहत असताना त्यांनी आपल्या कर्तृत्वाने अगदी तळातल्या कार्यकर्त्या पासून ते उपसभापती पदापर्यंत अशी अनेक पद भूषविली" असे नमूद करून त्यांनी विनोद मोरे यांना उदंड व निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
      अध्यक्षीय भाषणात बोलत असताना कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी "विनोद मोरे यांचा वाढदिवस हा एक पवित्र दिन कारण १९ जून रोजीच बाबासाहेबांनी मराठवाडा विद्यापीठाची स्थापना केली होती, विनोद मोरे हे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उच्च पदावरून सेवानिवृत्त झाले आपल्या सेवेत त्यांनी अनेकांना मदत केली, बौद्धजन पंचायत समिती मध्ये विनोद मोरे यांचे आगमन झाले त्यावेळी मोठ मोठ्या व्यक्तींसोबत त्यांनी काम केलं व त्यांच्या तालमीत ते घडले आणि तिथपासून वेगवेगळ्या समित्यांवर त्यांनी कामकाज केलेलं आहे आजही ते मोठ्या जबाबदारीने कार्यरत असून कोकण प्रांताचे संघटन करत आहे" अश्या शब्दात विनोद मोरे यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांनी विनोद मोरे यांना सभापती आनंदराज आंबेडकर, सर्व शाखा, समित्या, उपसमित्या, व्यवस्थापन मंडळ, विश्वस्त मंडळ, मध्यवर्ती कमिटी, महिला मंडळ यांच्या वतीने उदंड आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
      सदर सत्कारास उत्तर देत असताना भारावलेल्या मनाने "माझ्या ध्यानीमनी ही नव्हत की आज माझा वाढदिवस आहे परंतु आपण माझ्या वाढदिवसाचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून मला एक सुखद धक्का दिला आहे, मी समितीत आलो त्याकाळी कौन्सिलर म्हणून काम पाहत असताना शिक्षण समितीचे कामकाज पाहत असताना मुलांच्या शिक्षणा बाबत विचार मांडले ज्याने तळवटकर साहेब, रूखे साहेब हे भारावून गेले आणि हा मुलगा कोण आहे अशी विचारणा करून त्याला उद्या माझ्या कार्यालयात घेऊन या म्हणून आदेश दिला त्यावेळी यादव साहेब मला घेऊन गेले त्यावेळी तलवटकर साहेब मला म्हणाले की 'तू शिक्षण विषयावर चांगले विचार मांडले तर तू समितीचे काम पाहशील का ?' अशी विचारणा केली त्यांचा शब्द म्हणजे आदेश मानून मी होकार दिला आणि मला रात्रशाळेचे काम भेटले, मी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये कामाला असल्याने काम करून वस्त्या वस्त्यांमध्ये जाऊन मुलांना शोधून रात्रशाळेत त्यांची नोंद केली, पुढे मला न्यायदान कमिटीवर घेण्यात आलं माझ अक्षर आणि ड्राफ्टींग चांगल असल्याने पतपेढीचे ही काम मी सांभाळले अशी अनेक पद भूषवित मी उपसभापती पदा पर्यंत आलो आहे मला मोठ मोठ्या नेत्यांचं ही पाठबळ लाभलं आज सर्वांच्या आशीर्वादाने आणि सभापती आनंदराज आंबेडकरांच्या कृपेने मी आज उपसभापती म्हणून कार्य पाहतोय ही मला जी संधी भेटली आहे त्याच सोन करण्याचं मी काम करेल, शताब्दी महोत्सव ही आपण सर्वांनी हातात हात घेऊन चांगल्या पद्धतीने साजरा करूया; आपण सर्वांनी मला जे प्रेम दिल आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो" असे नमूद करून सर्वांचे आभार मानले.
       सदर प्रसंगी कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, सरचिटणीस राजेश घाडगे, उपकार्याध्यक्ष मनोहर सखाराम मोरे, एच. आर. पवार, चिटणीस श्रीधर साळवी, संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार, मनोहर बा. मोरे, विवाह मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, मध्यवर्ती महिला मंडळाच्या सरचिटणीस अंजलीताई मोहिते, निवडणूक मंडळाचे सदस्य अशोक कदम, पतपेढीचे कोषाध्यक्ष गायकवाड, बगाडे, कार्यालयीन सेवक प्रदीप तांबे, सचिव संजय मोहिते, राहुल कदम आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानून व विनोद मोरे यांना पुन्हा वाढदिवसाच्या व उदंड निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने उपसभापती विनोद मोरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न

मुंबई दि. २१ (रामदास धो. गमरे) बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती आणि कोकण प्रांताचे नेते विनोद सुदाम मोरे यांचा वाढदिवस १९ जून रोजी कार्याध्यक...