राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरिक सेवा संस्थेचे राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम 28 जून रोजी कोल्हापुरात !!
चंदगड ( प्रतिनिधी) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र व जागृत नागरीक सेवा, महाराष्ट्र यांच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून, रविवार दि. 28 जून रोजी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे भव्य राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो” या भावनेतून सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, अध्यात्म, आरोग्य, पत्रकारिता, उद्योग, कृषी, योगा, शासकीय व निमशासकीय सेवा अशा विविध क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या तसेच वंचित व उपेक्षित घटकांसाठी सेवाभावी वृत्तीने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करणे हा सोहळ्याचा हेतू आहे.
समाजभूषण, समाजरत्न, आदर्श पत्रकार, आदर्श शिक्षक/शिक्षिका, कामगार भूषण, कामगार रत्न, सहकार भूषण, कला भूषण, कृषी रत्न, साहित्य भूषण, उद्योग भूषण, उद्योग रत्न, आदर्श योग शिक्षक/शिक्षिका, आदर्श माता आदी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मध्ये मुंबईतील “वनिता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व राज्यघट कामगार शिक्षण चे मुंबई जिल्हाध्यक्ष ” डॉ. प्रभाकर तुकाराम कांबळे यांना “कोल्हापूर रत्न” या मानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. वनिता फाउंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार, म्हणून नावारूपाला आलेले असल्याने त्यांना 300 हून अधिक पुरस्कारांचे मानकरी असले तरी डॉ. कांबळे यांच्या 35 वर्षांच्या समाजसेवेची ही पोचपावती आहे.
इतर प्रमुख राष्ट्रीय शाहू पुरस्काराने : केरबा डावरे, संजीव चिकुर्डेकर, काळूराम लांडगे, पांडुरंग ठाणेकर, एकनाथ कंदले, अनंतराव घोगरे पाटील तसेच समाजरत्न पुरस्कार भरत सकपाळ, लीलावती पाटील, पोपट देसाई, राजेंद्र जाधव, अशोक मासाळे, जीवन गौरव पुरस्कार : विजय रणखांब, योगरत्न जीवनगौरव: विलास निकम, साहित्यरत्न: विनय पिंपरकर, राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्या मध्ये सीए किशोर बिंद सहकार भूषण, राजू सोनकांबळे सहकार भूषण, वैशाली कांबळे कामगार भूषण,विद्याधर राणे कामगार भूषण, दीपक शिंगरे सहकार रत्न, प्रशांतकुमार शेरवेगार सहकार भूषण,बाळकृष्ण तावडे सहकार भूषण, उत्तम जगताप आदर्श पत्रकार, रमेश नाईक महाराष्ट्र रत्न,वसंत पाटील कामगार व कवी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
राज्यातील महनीय व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते व मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. यावेळी डॉ. प्रभाकर कांबळे (मुंबई), अनिता काळे, रूपाली निकम, संजय सासने, संभाजी थोरात, भगवान माने, शिवाजी चौगुले, किशोर तळेले, महादेव चक्के, विजय रणखांब, केरबा डावरे, भरत सकपाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शाहू जयंती व समाजसेवेचा संगम
राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक न्याय, समता व वंचितांच्या उद्धाराचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या जयंतीदिनी “शाहू पुरस्कार” व इतर पुरस्कारांतून त्यांचा वारसा पुढे नेणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान ही काळाची गरज आहे.
हा पुरस्कार सोहळा म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निस्वार्थपणे काम करणाऱ्या “असली हिरों” चा गौरव आहे. डॉ. प्रभाकर कांबळे, राजेंद्र जाधव किशोर बिंद, राजू सोनकांबळे, वैशाली कांबळे यांच्यासारखे कृतीशील गुणवंत” जेव्हा एका मंचावर येतात, तेव्हा समाजसेवेची चळवळ अधिक तेजस्वी होते.. असे सुरेश केसरकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा