नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख ): नवी मुंबई येथील नेरुळ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिवारातील महिला सदस्यांनी सकाळी उद्यानात फिरावयास येत असलेल्या ज्येष्ठांना फादर्स डे च्या निमित्ताने पुष्पगुच्छ, चॉकलेट आणि स्वीट्स फराळ देऊन ज्येष्ठांचा सन्मान केला. नेरुळ येथील अहिल्याबाई होळकर सभागृहाच्या प्रांगणात दिनांक २१.६.२६ रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात स्थानिक नगरसेविका श्रीमती मीराताई पाटील यांच्या उपस्थितीने कार्यक्रम अधिक अधोरेखित झाला.
उपस्थितांशी संवाद साधताना मीराताई पाटील म्हणाल्या की फादर्स डे या दिनानिमित्त ज्येष्ठांचा सन्मान होतो आहे ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे. कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या उद्यान परिवारातील महिलांचं कौतुक करावे तेवढं थोडंच आहे. खरे तर आपली भारतीय संस्कृती ही उत्सव प्रिय आहे. त्यामुळे मदर्स डे, डॉक्टर्स डे, नर्स डे अशा प्रकारचे कार्यक्रम वेळोवेळी घेण्यात येतात. त्यात आपल्या उद्यान परिवाराचा नेहमीच सहभाग असतो, ही आनंदाची बाब आहे. अशा प्रकारच्या आशीर्वाद रुपी कार्यक्रमाने अभिनंदन सदिच्छा उपक्रमांच्या आयोजनाने परस्परातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होते. परिवारात एक सकारात्मक वातावरण निर्माण होते व राहते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ. सारिका वानखेडे यांनी सर्वांचे स्वागत करुन कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला व फादर्स डे या दिवसाचे महत्त्व सखोल पणे विशद केले.
सौ. सारिका वानखेडे, श्रीमती रीता दत्तो, श्रीमती मंजू बोलेल, श्रीमती सतवींदर बामरा, श्रीमती रंजना घुले, श्रीमती आलमा चंद्रबोस, श्रीमती ओमना पिल्ले, श्रीमती सरकार आदि महिलांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
श्री. जयेश भावसार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर श्री. सुभाष हांडे देशमुख यांनी कार्यक्रमाचे महत्त्व विशद करुन शेवटी सर्वांचे येथोचीत आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा