रविवार, २१ जून, २०२६
जेष्ठ नागरिकाचा विरंगुळा म्हणून कविसंमेलन उत्साहात साजरा !!
मुंबई ( विलास देवळेकर): दि. २० जून रोजी सायंकाळी भाईंदर पूर्वेकडील जेष्ठ नागरिक विरंगुळा संस्था भाईंदर (पू) रजि. आयोजित कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यात मुंबई, अंबरनाथ, टिटवाळा पालघर आणि विरार येथून निमंत्रित कवी आले होते. संस्थे बाहेरील कवींच्या कवितांचा आस्वाद संस्थेच्या सभासदांना घेता यावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. कविसंमेलनध्यक्षा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री वसुंधरा शिवणेकर यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून, कविसंमेलनाची सुरुवात झाली. जेष्ठ कवयित्री सरोज गाजरे यांनी सर्व कवींचा परिचय करून दिला. सर्व कवींनी स्वरचित कविता सादर केली. विरंगुळा संस्थेचे सभासद जेष्ठ कवी वय वर्षे ८५ असलेले विष्णू घोगळे यांनी सादर केले. तसेच, विरंगुळा संस्थेचे अध्यक्ष शंकर जंगम यांनीही कविता सादर केली. सुत्रसंचालन कवी भूपाल चव्हाण यांनी उत्तम पद्धतीने केले. सर्व सहभागी कवी आणि कवयित्रींना सहभाग "सन्मानपत्र व भेटवस्तू तसेच गुरुवंदना पुस्तक" प्रदान करून 'सत्कार' करण्यात आले. शेवटी सामुदायिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. आणि ह्या कार्यक्रमाची पूर्व तयारी सीताराम मालप, नरेश बिरवाडकर, आनंदा नाईक, भूपाल चव्हाण, संजय राऊत, आणि सौ. शारदा गावडे यांनी उत्तम रीतीने पार पाडली. उपस्थितांनी जाताना 'समाधानाने' आयोजनाचे कौतुक केले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
जेष्ठ नागरिकाचा विरंगुळा म्हणून कविसंमेलन उत्साहात साजरा !!
मुंबई ( विलास देवळेकर): दि. २० जून रोजी सायंकाळी भाईंदर पूर्वेकडील जेष्ठ नागरिक विरंगुळा संस्था भाईंदर (पू) रजि. आयोजित कविसंमेल...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा