आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २१ जून, २०२६

पत्रकार सतिश पाटील यांना मातृशोक

मुंबई (प्रतिनिधी ): " भावपूर्ण श्रद्धांजली "
जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला!
गं. भा. श्रीमती इंदुमती विष्णू पाटील वय वर्षे : ८५ यांचे दिनांक १७ जून  रोजी हॉस्पिटल मध्ये उपचारा दरम्यान दु:खद निधन झाले.आयुष्याच्या सुरवातीला खूपच खडतर परिस्थितीला सामोरे गेल्या. आपल्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी एकटीने न डगमता पार पाडली. जरी स्वतः अशिक्षित होती तरी मुलांना चांगले शिक्षण देऊन पायावर उभे केले. काही काळ शेती, भाजी, मासळीचा व्यवसाय अगदी प्रामाणिक पणे केला.आजही खूप ग्राहक प्रामाणिक पाटील ताई म्हणून नाव काढतात.नेहमीच सर्वांना मदतनीस व सल्लागार म्हणून गावात ख्याती होती.अनेकदा अडचणीत आर्थिक मदत करीत असत.भाडेकरू देखील आईच्या प्रामाणिक व मनमिळाऊ स्वभावाने अनेक वर्ष भाड्याने राहून गेल्यावर पण चांगले संबंध म्हणून घरच्या सारखे भेटीला येतात. पत्नी,आई, आजी व पणजी पर्यंतचा सुखकर प्रवास त्यांनी अनुभवला. आणि वयाच्या ८५ वर्षी त्याची प्राणज्योत मावळली.या कठीण काळात त्यांच्या सुनांनी आपल्या आईसारखी सेवा केली. जीवनात आणखी काय पाहिजे जन्म मृत्यू कोणाला चुकला आहे का! त्यांचा दशक्रिया विधी २६ जून सकाळी ७.३० वाजता  भांडुपेश्वर कुंड, भांडुपगाव, मुंबई व दिवस कार्य विधी २८ जून  सकाळी १० वाजता  राहत्या घरी पाटील निवास, नाहूर गाव, मुलुंड (प) मुंबई याठिकाणी होणार आहेत.
     " मरावे परी किर्तीरुपी उरावे "
अशा थोर मातेला समस्त पाटील परिवार, नातेवाईक व नाहूर गावातील मित्रपरिवार यांच्या कडून भावपूर्ण आदरांजली!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

जेष्ठ नागरिकाचा विरंगुळा म्हणून कविसंमेलन उत्साहात साजरा !!

मुंबई ( विलास देवळेकर): दि. २० जून रोजी सायंकाळी भाईंदर पूर्वेकडील जेष्ठ नागरिक विरंगुळा संस्था भाईंदर (पू) रजि. आयोजित कविसंमेल...