पवई (प्रतिनिधी ): सालाबादप्रमाणे यंदाही पवईत निळा भिमसागर उसळला होता पवई मोठ्या जल्लोमय वातावरणात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ व्या जन्मोत्सव भीम जयंती साजरी झाली करण्यात आली.
पवईतील पक्ष,संघटना,संस्था,मंडळ यांच्या वतीने मिरवणूक, देखावे,खीर दान,पाणी वाटप,सरबत वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप करत जयंती साजरी करण्यात आली.यावेळी विभागातील आंबेडकरी अनुयायांचा एकोपा दिसण्यात आला सर्व भिमसैनिक एकाच निळ्या झेंड्याखाली एकत्रित येत हा जयंती महोत्सव साजरा केला.चैतन्य नगर,गोखले नगर, आय.आय.टी मेन गेट-मार्केट,इंदिरा नगर,गरिब नगर,माता रमाबाई आंबेडकर नगर,हनुमान रोड अश्या इत्यादी ठिकाणी भिमसेवा मित्र मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या देखावा रॅलीचे स्वागत करण्यात आले.त्याचप्रमाणे हनुमान रोड येथील समाजसेविका कल्पना घोक्षे यांनी पाणी वाटप ठेवण्यात आले होते त्यावेळेस त्या विभागातील मुस्लिम बांधवांनी सहकार्य करत एकोप्याने जयंती साजरी केली.माता रमाबाई नगर मधील राहुल गाडे, रमाई मित्र मंडळचे कुणाल इनकर, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे नितीन गाडे,भिमसेना पवई प्रतिष्ठानाचे राहुल गच्चे व आय.आय.टी मार्केट येथे समाजसेवक शैलेश वानखेडे यांच्या वतीने देखील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा देखावा साकारण्यात आला होता.
पवईतील आंबेडकरी अनुयायी यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही एकोप्याने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पवई नगरीत अगदी जल्लोषात साजरी करताना दिसले आणि आमच्या सोबत बोलताना नागरिक सांगितले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी झाली पाहिजे पुढच्या वर्षी जयंती महोत्सव हा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरित करून महापुरुषांचे विचार रूजवणारी जयंती पवईत साजरी होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा