आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, १५ एप्रिल, २०२६

सुनिर्मल फाऊंडेशनच्या वतीने धारावीत अनोख्या पद्धतीने भीम जयंती साजरी !!

मुंबई :   नुकताच झालेल्या १४ एप्रिल २०२६ रोजी "सुनिर्मल फाऊंडेशन आणि सा. भगवे वादळ" च्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त 'शैक्षणिक साहित्य वाटप' तसेच तेजस्विनी पंडित लिखित 'इंग्रजी माझ्या खिशात'या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ अर्चनाताई शिंदे (नगरसेविका), श्री महादेव शिंदे (उपविभाग प्रमुख शिवसेना धारावी), श्री दिलीप गाडेकर (सामाजिक कार्यकर्ते) आणि शब्दश्री विलास देवळेकर (साहित्यिक व कवी) उपस्थित होते. मा. नगरसेविका अर्चनाताई यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, अभिवादन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला देवळेकर लिखित "भीम वंदना" घेण्यात आली. त्या नंतर देवळेकर रचित "डॉ. बाबासाहेब प्रतिज्ञा" उपस्थितांना देण्यात आली. त्या नंतर कवयित्री सौ विमल गजरेताई यांनी "भीम गीत" सादर केले आणि शेवटी देवळेकर यांनी आपल्या म्युझिकल इक्को साऊंड सिस्टीम मध्ये "डॉ. बाबासाहेब यांनी वापरलेल्या वस्तू वर कविता" सादर केली. कार्यक्रमाची 'प्रस्तावना' आयोजक दत्ता खंदारे यांनी केली.त्या वेळी मोठे बंधू सुनील खंदारे यांचे स्मरण होताच ते भावूक झाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त "साप्ताहिक भगवे वादळचा विशेषांक" प्रकाशित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.धारावी चे सामाजिक कार्यकर्ते दिलीप गाडेकर यांनी "दोन्ही संघटनेचे कौतुक" केले. तसेच महादेव शिंदे यांनी दत्ता खंदारे यांच्या "सुरुवातीपासूनचा कार्याचा पाढाच" वाचला. ते ऐकून सर्व उपस्थितांनी खंदारे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव टाळ्यांचा गजरात' केला. आणि नगरसेविका अर्चनाताई यांनी सर्व उपस्थित "शालेय ते प्रौढ विद्यार्थीचे कौतुक" करत शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या हस्ते 'शैक्षणिक साहित्य' वाटप करण्यात आले. यावेळी स्थानिक रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते गिरीराज शेरखाने,प्रतिक्षा नगरचे सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण, राम म्हस्के, भावेश खंदारे, रेखा सदाफुले आवर्जून उपस्थित होते.तसेच धारावी पोलीस पंचायत बिट क्रमांक २चे सर्व सभासद उपस्थित होते.देवळेकर लिखित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या "आद्याक्षराने ६ फुट कविता फ्लॅक्स" सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. अशा प्रकारे, खऱ्या अर्थाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'विचारांची जयंती' साजरी करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी........ श्रद्धा, सबुरी आणि कृपेचा दिव्य संदेश

भारतभूमी ही संतांची पावन भूमी आहे. या भूमीत अनेक महान संतांनी मानवजातीला अध्यात्म, भक्ती आणि सदाचाराचा मार्ग दाखवला. अशाच तेजस्वी संतांपैकी ...