सदर संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन द लॉर्ड बुद्ध धम्म टुर्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. यावेळी यामध्ये पवईतील तसेच आसपासच्या परिसरातील कलाकारांना निमंत्रण देऊन त्यांच्या कलेला दाद देण्याचे काम या संस्थेच्या वतीनं करण्यात आले. ही संस्था सालाबादप्रमाणे पवईत महापुरुषांचे विचार जनमानसात पोहचवण्यासाठी सदैव तत्पर असते.या संयुक्त जयंती महोत्सवात कवी,गायक, समाजसेवक इत्यादी यांनी सहभाग घेत महापुरुषांचे विचार जनमानसात पोहचविले.तसेच कार्यक्रमाची सुरवात त्रिशरण पंचशील घेऊन झाली.
जयंती महोत्सव यशस्वी रित्या संपन्न करण्यासाठी संस्थेतील रमेश वाटेकर,सुरेश गाडे,कल्पना घोक्षे,सुजल मोरे,वर्षा गायकवाड,सरला गांगुर्डे,संपदा जाधव,रमेश सोनपसारे,बाळु घोक्षे यादी पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा