आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, १५ एप्रिल, २०२६

जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची१३५ वी जयंती उत्साहात साजरी

डोंबिवली(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) डॉ.भिमराव रामजी आंबेडकर हे केवळ व्यक्ती नव्हते, तर ते एक विचार होते.त्यांची जयंती साजरी करणे म्हणजे भारतीयांना आनंदचा क्षण असतो.त्याच अनुषंगाने जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने डोंबिवली येथील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली कार्यालयाजवळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून१३५वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सर्व प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला प्रमुख पाहुणे भारतीय पोलीस सेवा दलातील आयपीएस अधिकारी शिवम वखरे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच इतर प्रमुख पाहुणे भंडारी मंडळाचे विश्वस्त संजय पोखरणकर, उद्योग ऊर्जा बिझनेस संस्थेचे संस्थापक जादुगार अभिजित(भगवान पवार), क्राईम बाॅर्डर पोलीस पत्रकार राजेंद्र वखरे, कवयित्री, निवेदिका, गायिका सुनिता काटकर, स्वानंद इन्व्हेस्टाच्या संचालिका चित्रा राऊत, म्युझिक मंत्रा एंटरटेनमेंटच्या संचालिका शर्मिला केसरकर,आयसाईट फिनट्रेड प्रा.लि.चे पार्टनर अभिषेक मुणगेकर, भंडारी मंडळाचे अध्यक्ष रजनिश चौगुले, सिंधुदुर्ग जिल्हा मित्र मंडळाचे गोविंद म्हाडगुत, भंडारी मंडळाचे विश्वस्त रघुवीर तांडेल, सरचिटणीस महेश पारकर, संस्थेचे जेष्ठ सल्लागार अरविंद सुर्वे,सिध्दपा भोरकडे,खजिनदार दत्ता कडुलकर, जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर आदी मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे दर्शन घेऊन अभिवादन केले.अशा या महामानवाला कोटी कोटी प्रणाम!! सर्व उपस्थित प्रमुख पाहुण्यांना अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, खजिनदार दत्ता कडुलकर, संस्थेचे जेष्ठ सल्लागार अरविंद सुर्वे यांच्या हस्ते शाल, गुलाब पुष्प,कार्य अहवाल, आकर्षक पेन व आभार पत्र प्रदान करुन यथोचित सत्कार करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेष्ठ सल्लागार अरविंद सुर्वे, खजिनदार दत्ता कडुलकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी........ श्रद्धा, सबुरी आणि कृपेचा दिव्य संदेश

भारतभूमी ही संतांची पावन भूमी आहे. या भूमीत अनेक महान संतांनी मानवजातीला अध्यात्म, भक्ती आणि सदाचाराचा मार्ग दाखवला. अशाच तेजस्वी संतांपैकी ...