आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, १५ एप्रिल, २०२६

जेष्ठ नागरिक सेवाभावी संस्था घणसोली तर्फेभारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

घणसोली नवी मुंबई :- जेष्ठ नागरिक सेवाभावी संस्था (रजिस्टर ) घणसोली नवी मुंबई तर्फे भारतीय घटनेचे शिल्पकार ,भारतरत्न व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंती चा कार्यक्रम कै अण्णासाहेब पाटील उद्यान सेक्टर ४,घणसोली मधील जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र येथे मंगळवार दिनांक १४ एप्रिल  रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला होता.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री भास्कर आव्हाड यांनी भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला  तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले .या प्रसंगी जेष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेचे अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात अध्यक्ष श्री भास्कर आव्हाड , श्री रमेश रणपिसे , श्री अशोक जाधव ,विश्वनाथ बोडके ,श्री आमोणकर व श्री प्रभाकर देशमुख इत्यादी चा समावेश होता.  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना १३५ व्या जयंती निमित्त सर्वांनी विनम्र अभिवादन करून आणि भीम प्रार्थना म्हणून हा कार्यक्रम उत्साहात साजरा केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी........ श्रद्धा, सबुरी आणि कृपेचा दिव्य संदेश

भारतभूमी ही संतांची पावन भूमी आहे. या भूमीत अनेक महान संतांनी मानवजातीला अध्यात्म, भक्ती आणि सदाचाराचा मार्ग दाखवला. अशाच तेजस्वी संतांपैकी ...