आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १९ एप्रिल, २०२६

ट्रॉमा केअर रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर ; मनपा प्रशासन मात्र गाढ झोपेत!

मुंबई (उदय वाघवणकर) - जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयातील बहुउद्देशीय कंत्राटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतनच मिळालेले नाही. त्याचप्रमाणे २०२१ ते २०२४ या कालावधीतील त्यांचे भविष्य निर्वाह निधी आणि राज्य कामगार विमा योजनेचे पैसेही भरण्यात आले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळपासूनच कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे रुग्णालयातील आरोग्यसेवा कोलमडली आहे.ट्रॉमा केअर रुग्णालयात केअर वन कंपनी आणि केएचएफएम कंपनीला रुग्णालयातील साफसफाईसाठी बहुउद्देशीय कामगार पुरविण्याचे कंत्राट आहे मात्र या दोन्ही कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना किमान वेतनानुसार वेतन देण्यात आले नाही. तसेच केअर वन कंपनी अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांचे मागील २७ दिवसांचे तर केएचएफएम कंपनीने मागील १५ महिन्यांचे भविष्य निर्वाह निधी व राज्य कामगार विम्याचे पैसे भरलेले नाहीत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मैत्रीचा सुवर्ण महोत्सव !! ५० वर्ष आयुष्य घडवणारी मैत्री..

     आज अक्षय्य तृतीया. स्वयंसिद्ध मुहूर्त मानल्या गेलेल्या या दिवसाचे महत्त्व मानवी जीवनाच्या प्रवासात खूप महत्त्वाचे मानले गेले आहे. धार्म...