कार्यक्रमाची सुरुवात या वर्षी निधन पावलेल्या आजी-माजी मुख्याध्यापक संघाचे सदस्य आणि प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहून झाली.
तदनंतर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यांनी सांगितलं की ते विद्यार्थी दिवसा कष्टाचे काम करून रात्रीच्या वेळी तीन तासात शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना रात्र शाळा वरदान ठरतात.गरीब व गरजू कष्टकरी विद्यार्थ्यांना इंग्रजीचे शिक्षण मिळावे या उद्देशाने 1855 साली महात्मा ज्योतीबा फुले यांची पुणे येथे आणि 1866 साली भिकोबा चव्हाण यांनी प्रथम मुंबईत रात्र शाळा सुरू केली. औद्योगिक शहरात दिवसाच्या शाळेला जोडून रात्र शाळा सुरू करण्यात आल्या.
नंतर 1947 ते 1953 दरम्यान पुणे, नागपूर,मुंबई, कोल्हापूर, या शहरात रात्रशाळा सुरू करण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन रात्र कनिष्ठ महाविद्यालय रात्र महाविद्यालय सुरू करण्यात आली. रात्री शाळांच्या कार्याची सूत्रता आणण्यासाठी सन 1951 रोजी मुख्याध्यापक संघाची स्थापना करण्यात आली 1990 साली पब्लिक ट्रस्ट अॅक्ट नुसार संस्था रजिस्टर करण्यात आली. त्यानंतर वेगवेगळ्या शहरात हे अधिवेशन घेण्यात येत आहे.
रात्र शाळा शिक्षक विद्यार्थी यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून समन्वयाने मार्ग काढण्याचे काम संघटना गेली साठ वर्ष करत आहे शिक्षकांचे प्रबोधन उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांच्या व रात्र शाळांचा गौरव विद्यार्थ्यांचा सत्कार दरवर्षी संघटनेमार्फत केला जातो शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्यामार्फत शिक्षकांचे व विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोन सहानुभूती आहे.आता रात्र शाळांच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत रात्र शाळा टिकायला पाहिजे असं त्यांनी सांगितले. रात्र शाळा बंद होता कामा नये असे त्यांनी सूचित केले.
तदनंतर शिक्षक भारतीचे कार्यवाह श्री सुभाष मोरे यांनी सविस्तरपणे रात्र शाळांचे प्रश्न मांडले रात्र शाळांमध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत शून्य संच मान्यता विद्यार्थी असताना का देतात? अनेक प्रश्न रात्रशाळांचे अनेक प्रश्न शासन दरबारी रखडले आहेत रात्र शाळांचे धोरण निश्चित करण्यासाठी समिती स्थापन केली होती त्याचा अहवाल अजून दिला नाही. शिक्षक काम करत आहेत पण वेळेवर पगार मिळत नाही.
आदरणीय शिक्षक भारतीचे अध्यक्ष श्री बेलसरे सर यांनी संपूर्ण रात्रशाळांचा इतिहास सांगितला पूर्वी रात्र शाळांची परिस्थिती काय होती आणि आता काय आहे शासनाने जर मदत केली तर सगळं सोपस्कार होईल. श्री सातपुते सर यांनी रात्र शाळेमध्ये विद्यार्थी कसे वाढवायचे हे सांगितले आणि रात्र शाळांना शासनातर्फे संध्याकाळी मोफत आहार मिळतो काही ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे ज्या शिक्षकांना नेमणूका चुकीच्या दिलेल्या आहेत असे त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट सांगितले. आदरणीय माजी आमदार कपिल पाटील साहेब यांनी रात्र शाळा तुम्हाला जर टिकवायच्या असतील तर तुम्हाला प्रथम विद्यार्थी वाढवावे लागतील ज्या शासनाने रात्र शाळा बंद केलेल्या आहेत त्या सर्व रात्र शाळा आपण पूर्ववत सुरू करू आणि आणखी नवीन रात्रशाळा आपण निर्माण करू म्हणजे नवीन सुरु करु असे त्यांनी ग्वाही दिली. आणि रात्र शाळांची लढाई अधिक जोमाने चालू ठेवायला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापक संघातर्फे दरवर्षी दिले जाणारे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार आदरणीय माजी आमदार कपिल पाटील साहेब आणि अशोक बेलसरे सर यांच्या हस्ते शाल, बुके देऊन पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापकांना गौरविण्यात आले
शेवटी मुख्याध्यापक संघाचे कार्यवाह श्री शिवाजी खैरमोडे यांनी आभार मानले आणि कार्यक्रम संपन्न झाले असे जाहीर केले.
या कार्यक्रमासाठी माजी आमदार कपिल पाटील शिक्षक भारती अध्यक्ष अशोक बेलसर सर, मुख्याध्यापक संघ सल्लागार आदरणीय दिनेश कुमार त्रिवेदी सर,शिक्षक भारती कार्यवाह सुभाष मोरे, सर. शिक्षक भारती साहित्य संमेलन अध्यक्ष जयवंत पाटील सर, शिक्षक भारती प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर , शिक्षक भारती प्राथमिक विभाग अध्यक्ष नवनाथ गेंड सर, शिक्षक भारती ज्यूनियर कॉलेज अध्यक्ष शरद गिरमकर सर, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे मुंबई अध्यक्ष देविदास पडांगळे मधुकर कांबळे,कोकीतकर सर,
पुण्याचे सातपुते, कुलाल सर, श्री रवी कांबळे, अजित वाघमारे, नवनाथ जाडकर छात्र भारती कार्यवाह सचिन काकड,
ह्या सर्वाच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीयुत दत्तात्रेय सोनवणे सर यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा