आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २०२६

कोअर बँकिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनीच्या मुंबई कार्यालयाचा उद्घाटन कार्यक्रम

मुंबई ( प्रतिनिधी) कोअर बँकिंग क्षेत्रातील 300 ते 400 सॉफ्टवेअर कंपन्यांना जोडणारी हिजयुअल इन्फोसिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड मुंबई येथील कार्यालयाचे उद्घाटन शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2.वाजता सुजाता चेंबर अभयचंद गांधी मार्ग मज्जिद बंदर पश्चिम येथे पतसंस्था व्यवस्थापन डायरीचे संपादक अंकुश यादव यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून दत्त दिगंबर चे कुटुंब प्रमुख लक्ष्मण निकम शिवप्रसाद को-ऑपरेटिव्ह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुण चोरगे जगन्नाथ पतपेढी चे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मोहिते पुष्पक सोसायटीचे जनरल मॅनेजर किरण पवार श्लोक को. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अविनाश पाटील देवांग सहकारी पतपेढीचे संस्थापक अध्यक्ष तानाजी तोडकर निवडणूक निर्णय अधिकारी व राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे मुंबई जिल्हाध्यक्ष वनिता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गुणवंत कामगार डॉ. प्रभाकर तुकाराम कांबळे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न होणार असून सर्व सहकारी संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते व सॉफ्टवेअर क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन हिजयुअल इन्फोसिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक भाऊराव धोंडे पाटील सीईओ योगेश कोठाळे सेल्स मॅनेजर सुभाष यादव यांनी केले असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

कै. आर .एन. मित्तल, माजी अध्यक्ष, अखिल भारतीय वरिष्ठ महासंघ यांना भावपूर्ण श्रद्धांजली

नेरुळ : येथील ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळ यांच्या विद्यमाने अखिल भारतीय वरिष्ठ महासंघाचे माजी अध्यक्ष माननीय आर. एन. मित्तल यांच्या ६ फेब्रुवा...