आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २०२६

सृजनशील विद्यार्थी घडवणारे मोठे व्यासपीठ म्हणजे अगस्त्या : API आदिती भालके

नवी मुंबई(प्रदीप कासुर्डे):अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन आणि Adobe यांच्या संयुक्त विद्यमाने देवडीगा भवन नेरूळ नवी मुंबई येथे इनोव्हेशन एक्सप्रेस हे नवोपक्रम सादरीकरणाचे दोन दिवसीय प्रदर्शन संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. आदिती भालके - एपीआय नवी मुंबई, मा.प्रवीण सरनाईक - लायन्स क्लब, मा.ॲडव्होकेट स्वप्ना गावडे - नगरसेविका नवी मुंबई, मा.वैभव जाधव - संस्थापक जयश्री फॉउंडेशन, मा. विक्रांत सोळंकी - चिफ एक्सपेरियन्स ऑफिसर , मा. पराग सावंत रिजनल एक्सपेरियन्स लीडर, कल्याणी मॅम, सोनाली मॅम, मा. प्रेमा मॅम, प्रियंका पाटील व अगस्त्या टीम उपस्थित होती.
 प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय प्रवीण सरनाईक फर्स्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन्स क्लब हे उपस्थित होते.
 इनोएशन एक्सप्रेस ही स्पर्धा ॲडोब व अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्यामार्फत घेण्यात आली. 
        दोन पात्रता फेरीमध्ये झालेली ही स्पर्धा ज्यामध्ये २४०० ते २५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातून निवडक ३०० ते ३५० विद्यार्थ्यांची गटवार मॉडेल्स प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेली होती. यामध्ये विद्यार्थ्यांना जाणवलेली दैनंदिन जीवनातील एखादी समस्या निवडून त्यावर योग्य उपाय कसा करता येईल त्याचे प्रात्यक्षिक या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आले होते. प्राथमिक फेरीमध्ये विद्यार्थ्यांच्या उत्तम प्रतिसादानंतर संस्थेने परीक्षकांमार्फत निवडक 53 प्रात्यक्षिकांची निवड ह्या इन्वेंशन एक्सप्रेस मध्ये करण्यात आलेली होती. प्रदर्शन सर्व विद्यार्थ्यांसाठी खुले ठेवण्यात आलेले होते. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून माननीय समीर सर आणि पल्लवी गायकवाड हे लाभले. दोन दिवशीय प्रदर्शनामध्ये सर्व उपक्रम उपक्रमांची परीक्षण व निरीक्षण करून परीक्षकांनी त्यातील काही निवडक प्रात्यक्षिकांची निवड केली व त्यांना रोख रक्कम पारितोषिक प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
 आपण विद्यार्थी असताना आपणाला विविध कल्पना सुचतात परंतु त्या कशा साकार करायच्या याची माहिती आपल्याला मिळत नाही पण अगस्त्यमार्फत हा जो उपक्रम चालवला जातो तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाबरोबरच स्वतःमधील सुप्त गुण ओळखून त्यांना चांगले मार्गदर्शन देऊन सामाजिक भान जपत दैनंदिन जीवनात येणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण कसे करता येईल, त्याचे निरसन कसे करता येईल, यावर विचार करायला भाग लावणारे उपक्रम अगस्त्या घेते हे खूपच उल्लेखनीय आहे. विद्यार्थी घडवताना फक्त ज्ञानच नाही तर कौशल्य सुद्धा त्याला विकसित करता आलं पाहिजे त्यासाठी संस्था अविरत प्रयत्नशील राहते ही खूपच उत्तम गोष्ट आहे. असे मा. आदिती भालके म्हणाल्या. 
         तसेच कार्यक्रमाला जवळपास २५ पेक्षा जास्त शिक्षकांनी व ८०० पेक्षा जास्त विद्यार्थींनी भेट दिली. कार्यक्रमात VR, Drone, Cretile Kit, 3 D Printer सारख्या वेगवेगळ्या कार्यशाळा पण घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांतकुमार मोहिते यांनी केले तर आभार सीनियर एरिया लीड सार्थक सपकाळ यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

कै. आर .एन. मित्तल, माजी अध्यक्ष, अखिल भारतीय वरिष्ठ महासंघ यांना भावपूर्ण श्रद्धांजली

नेरुळ : येथील ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळ यांच्या विद्यमाने अखिल भारतीय वरिष्ठ महासंघाचे माजी अध्यक्ष माननीय आर. एन. मित्तल यांच्या ६ फेब्रुवा...