आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २०२६

दिशा महाराष्ट्राची वाहिनीच्या द्वारे "सन्मान कर्तृत्वाचा गौरव स्त्री वर्गाचा" कार्यक्रमाचे आयोजन

नवी मुंबई दि. १३ (रामदास धो. गमरे) दिशा महाराष्ट्राची या YouTube चॅनेल च्या माध्यमातून गेली तीन वर्षे अनेक स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत असून त्याद्वारे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करते करून गौरविण्यात आले आहे, तसेच मराठी भाषा, साहित्य, चर्चा, परिसंवाद, कविसंमेलन सद्य घडामोडींवर लिखाण करून प्रसिद्ध करणे असे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत त्याच पार्श्वूमीवर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून "उत्सव महिला दिनाचा सन्मान स्त्री जन्माचा" या माध्यमातून आपल्या कर्तुत्वाने विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या ५० महिलांची निवड करून त्यांना "राज्यस्तरीय माता सावित्रीबाई फुले सन्मान सोहळा २०२६", "राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ सन्मान सोहळा २०२६" देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. सदर पुरस्कार समाजिक, राजकीय, सहकार, शिक्षण, उद्योग, कृषी, साहित्य, क्रीडा, अध्यात्म, पत्रकारिता, युवा, डॉक्टर, महिला बचत गट या नामांकन विभागांतर्गत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात येणार असून सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि मानाचा फेटा असे पुरस्काराचे स्वरुप आहे. सदर कार्यक्रम रविवार दि. १५ मार्च २०२६ सकाळी १०:३० ते ४:३० वेळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता भवन, प्लॉट नं. ४१, तेजस्विनी वर्किंग वुमन्स हॉस्टेल समोर, सेक्टर नं. १०, जुईनगर येथे आयोजित करण्यात आला आहे तरी इच्छुक महिलांनी दिशा महाराष्ट्राची वाहिनीचे प्रमुख संपादक तुषार गौरव नेवरेकर यांना ७२१८४६७९६३ या भ्रमणध्वणी वर संपर्क साधून आपला प्रस्ताव पाठवावा असे आवाहन दिशा महाराष्ट्राची वाहिनीचे प्रमुख संपादक तुषार गौरव नेवरेकर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

कै. आर .एन. मित्तल, माजी अध्यक्ष, अखिल भारतीय वरिष्ठ महासंघ यांना भावपूर्ण श्रद्धांजली

नेरुळ : येथील ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळ यांच्या विद्यमाने अखिल भारतीय वरिष्ठ महासंघाचे माजी अध्यक्ष माननीय आर. एन. मित्तल यांच्या ६ फेब्रुवा...