आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २०२६

जॉय संस्थेचे सल्लागार व जेष्ठ पत्रकार श्री. सुभाष हांडे देशमुख यांचा पुतण्या कौस्तुभ आणि ओजस्विनी यांचा शुभविवाह संपन्न

नगर जिल्ह्यातील इतिहास व संस्कृतीची साक्ष देणाऱ्या कोपरगाव या पावन भूमीत संत जनार्दन स्वामी मंगल कार्यालय मध्ये श्री. कौस्तुभ आणि सौ. ओजस्विनी यांचा शुभविवाह ३ फेब्रुवारी २०२६ रोजी थाटामाटात संपन्न झाला. या अत्यंत आनंदमय आणि मंगल सोहळ्यात स्थानिक मान्यवर तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वधू-वरांस शुभ आशीर्वाद दिले. 
     परंपरा, संस्कार आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेला हा विवाह कौस्तुभ आणि ओजस्विनी या उभयतांच्या जीवनप्रवासाला प्रेम, विश्वास, समजूत आणि परस्पर सन्मानाने समृद्ध करेल अशा मनःपूर्वक सदिच्छा उपस्थितांनी व्यक्त करतानाच उभयतांचे वैवाहिक आयुष्य सुख, समाधान, आरोग्य, यश आणि कौटुंबिक प्रवास, आनंदाने सदैव फुलत राहो असे अभिष्टचिंतन केले.
     आदरणीय श्री. निखिल जोशी गुरुजी यांनी संपूर्ण लग्न सोहळा पारंपरिकतेने विधीपूर्वक पार पाडलाच; त्यात प्रामुख्याने या मंगलमय प्रसंगी सप्तपदीचे धार्मिक महत्त्व, वधू वरांकडुन सात पावले चालवून प्रत्येक पावलाचे पावित्र्य आणि त्याचे जीवन प्रवासातील महत्त्व विशद करून लग्नविधी अधिक अधोरेखित केला. सप्तपदीतील प्रत्येक पावलासाठीचा संस्कृत श्लोक आणि त्याचे मराठीतून त्यांनी केलेले अर्थपूर्ण विश्लेषण कार्यक्रमात सहभागी झालेल्यांनाही अधिक भावले. 
     खरे तर ! कौस्तुभ म्हणजे कौस्तुभ मण्याप्रमाणे तेज, सदगुण व श्रेष्ठत्वाचे प्रतीक तर ओजस्विनी म्हणजे ऊर्जा, चैतन्य, बुद्धिमत्ता व सकारात्मकतेची मूर्तीमंत प्रतिमा... यांचा शुभविवाह गोदावरी मातेच्या तीरावर मंगलमय वातावरणात संपन्न झाला. दैवी साक्षीने, कुटुंबीयांच्या आशीर्वादाने आणि आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या नवजीवनप्रवासात, परस्पर प्रेम, विश्वास, समजूतदारपणा व संस्कारांच्या बळावर नवदाम्पत्याचा संसार सदैव आनंदी, समृद्ध व प्रेरणादायी ठरो, हीच मनःपूर्वक सदिच्छा ईश्वरचरणी प्रार्थना!
   सन्माननीय वधू पिता संदीपराव, मामा नंदकिशोर पवार व त्यांच्या परिवाराने लग्न सोहळा खूप छान तऱ्हेने संपन्न केला. सोहळ्याचे आयोजन, नियोजन चांगले तर होतेच त्याचबरोबर भोजनही खूप स्वादिष्ट होते. लग्न सभागृहही भव्य, सुटसुटीत आणि स्वच्छता पूर्ण होते. एकंदरीत संपूर्ण लग्न सोहळा उत्तम रीतीने पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

कै. आर .एन. मित्तल, माजी अध्यक्ष, अखिल भारतीय वरिष्ठ महासंघ यांना भावपूर्ण श्रद्धांजली

नेरुळ : येथील ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळ यांच्या विद्यमाने अखिल भारतीय वरिष्ठ महासंघाचे माजी अध्यक्ष माननीय आर. एन. मित्तल यांच्या ६ फेब्रुवा...