आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, १० जानेवारी, २०२६

नेरे गावचा सुपुत्र किशन खारके राष्ट्रीय नेमबाज, रायगड भुषण ठरला सेंटर फायर पिस्तूल शूटिंग मधील पहिला रायगड जिल्हा व नवी मुंबई चा विख्यात (Renowned shooter)नेमबाज

गडब (अवंतिका म्हात्रे )दिनांक 17 डिसेंबर 25 ते 4 जानेवारी 2026 दरम्यान डॉ. कर्णिसिंग शूटिंग रेंज 68 वि राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा संपन्न झाली ह्या स्पर्धेत सिद्धांत रायफल क्लब चा नेमबाज किशन खारके ह्यानी 535 गुण संपादन करून सेंटर फायर पिस्तूल मध्ये विख्यात नेमबाज (Renowned shooter)होण्याची पदवी संपादन केली, ह्या स्पर्धेत क्लब चे नेमबाज issf coach जयंत साळवे मुंबई ह्यानी ही 25 मीटर सेटर फायर पिस्तूल मध्येविख्यात नेमबाज होण्याची पदवी संपादन केली तसेच 10 मीटर पिस्तूल शूटिंग मध्ये सुप्रिता सुबुद्धी 558 गुण संपादन करून भारतीय ट्रायल साठी निवड झाली,हे सर्व सिद्धांत रायफल क्लब च्या ईंडियन माॅडेल स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज येथे अलंकार कोळी,किशन खारके, जयंत साळवे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक स्वत व इतर नेमबाज ह्यांच्यासाठी प्रशिक्षणही देत आहेत. 
यांच्या या यशाबद्दल क्लब चे अध्यक्ष विजय खारकर, सचिव किशन खारके, प्रितम पाटील, महेश फूलोरे नगरसेवक अंबरनाथ, समाधान घोपरकर सरपंच दापोली,अजिंक्य चौधरी काटई, किरण माळी,अविनाश भगत, सुरज थळे,सागर भोईर,किरण मोहिते, निलेश भगत, प्रकाश दिसले,हेमंत भगत, संदेश पाटील, जगदीश पाटील, शैलेश पाटील, जयदास पाटील, अर्जुन पाटील, संतोष फडके,जितेश पाटील, राजू मुंबईकर समीर आंबवने सर नंदकुमार मुंबईकर तसेच क्लब चे सदस्य व मित्र परिवार व ग्रामस्थ नेरे ह्यनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

श्री म्हसोबा देवस्थान उत्सवाचे आयोजन

मुंबई (पी.डी.पाटील): मेघवाडी, डॉ. एस्. एस्. राव रोड, लालबाग, मुंबई येथील श्री म्हसोबा मंदिर समिती व मेघवाडीतील रहिवाश्यांच्या वतीने गुरुवा...