मुंबई (सतीश पाटील) : लोकनेते दि.बा. पाटील साहेब यांच्या जन्मशताब्दी निमित्त पनवेल ऊरण आगरी समाज मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे रविवार दिनांक ०४ जानेवारी रोजी मंडळाचे महात्मा फुले सभागृहात पनवेल येथे करण्यात आले होते. यावेळी ८७ व्यक्तींनी रक्तदान करून लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांना आदरांजली वाहिली. शिबिराचे उद्घाटन सुप्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते झाले. शिबिरास मा. खासदार रामशेठ ठाकूर साहेब, डॉ. नितीन म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेविका दर्शना भोईर व अनेक मान्यवरांनी भेट देऊन रक्तदात्यांचा व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.मुंबई पत्रकार श्री. सतिश पाटील यांनी देखील रक्तदान केले याआधी त्यांनी सहा वेळा रक्तदान केले आहे. याप्रसंगी सर्व रकतदात्याना प्रमाण पत्र व दि.बा. पाटील यांच्या नावाने भेटवस्तू, थर्मास बॉटल आगरी समाज मंडळाच्या माध्यमातून देण्यात आली.शिबिराचे आयोजनासाठी पनवेल उरण आगरी समाज मंडळाचे अध्यक्ष अतुल दि.बा. पाटील, सचिव बी.पी. म्हात्रे, कोषाध्यक्ष विजय गायकर यांनी खूप मेहनत घेतली.शिबीर आगरी समाज उरण -पनवेल मंडळ व रूधिरसेतु सेवा संस्था पनवेल यांच्या विद्यमाने संपन्न झाला. प्रत्येकाने रक्तदान करून मानवता धर्माचे सार्थक करावे.तुमचे एक रक्तदान अनेकांना जीवनदान देऊ शकते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक बाळकृष्ण कासार यांच्या 'सिंदूर' या दिवाळी अंकाला महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघाकडून पुरस्कार
मुंबई (शांताराम गुडेकर): लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक बाळकृष्ण कासार यांच्या 'सिंदूर' या दिवाळी अंकाला महाराष्ट्र मुक...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा