आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, ८ जानेवारी, २०२६

मुक्त पत्रकार संघाच्या वतीने बाळ पंडित यांना सन्मान

मुंबई : महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघ मुंबई यांच्या २५ व्या रौप्य महोत्सवी व बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून दि. ६ जाने. २०२६ पत्रकार दिना दिवशी महाराष्ट्रातील २५ ज्येष्ठ प्रत्रकारांचा मुंबईत बी आर दंडवते सभागृह, ना. म. जोशी मार्ग, येथे सन्मान करण्यात आला.
       विजय उर्फ बाळ पंडित यांना त्यांच्या समाज प्रबोधन कार्य, विविध वृतपात्रातून केलेली प्रत्रकारिता व सामाजिक व धार्मिक सेवाभावी कार्याची दाखल घेऊन, मराठी मुक्त पत्रकार संघा तर्फे शाल, सन्मानपत्र, पुष्य गुच्छ देऊन सम्मान करण्यात आला.
        या सोहळ्यास प्रमुख अतिथी - डॉ. जगन्नाथ हेगडे (माजी नगरपाल ), ज्येष्ठ संपादक - सुकृत खांडेकर, समाज सेविका - जयश्री संगीतकार व मुक्त पत्रकार संघांचे अध्यक्ष - प्रकाश पाटकर, कार्यवाह - अशोक भोसले, सह ऍड. सुनिल शिर्के, छाया गचके सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई बाहेरील संपूर्ण महाराष्ट्रातून असंख्य मुक्त पत्रकार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक बाळकृष्ण कासार यांच्या 'सिंदूर' या दिवाळी अंकाला महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघाकडून पुरस्कार

मुंबई (शांताराम गुडेकर):  लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक बाळकृष्ण कासार यांच्या 'सिंदूर' या दिवाळी अंकाला महाराष्ट्र मुक...