आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, ८ जानेवारी, २०२६

पत्रकार सतीश पाटील यांना ‘स्वामी विवेकानंद राष्ट्रीय गौरव सन्मान’ जाहीर

मुंबई (प्रतिनिधी ):पत्रकार सतीश पाटील यांना ‘स्वामी विवेकानंद राष्ट्रीय गौरव सन्मान’ जाहीर
१२ जानेवारी रोजी पश्चिम बंगालमध्ये होणार गौरव सोहळा रिष्रा (जि. हुगळी, पश्चिम बंगाल) :
पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पत्रकार सतीश पाटील यांची ‘स्वामी विवेकानंद राष्ट्रीय गौरव सन्मान’ साठी निवड करण्यात आली आहे. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सेवा जीव कल्याण ट्रस्ट, २२/११, डॉ. पी. टी. लहा स्ट्रीट, रिष्रा, जिल्हा हुगळी (पश्चिम बंगाल) यांच्या वतीने प्रदान करण्यात येणार आहे.
        हा सन्मान सोहळा दि. १२ जानेवारी २०२६ रोजी, स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमात पत्रकार सतीश पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
पत्रकार सतीश पाटील यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न, सामान्य जनतेच्या अडचणी तसेच लोकहिताच्या विषयांना सातत्याने व निर्भीडपणे वाचा फोडली आहे. त्यांच्या या समाजोपयोगी व मूल्याधिष्ठित कार्याची दखल घेत सेवा जीव कल्याण ट्रस्टकडून हा राष्ट्रीय पातळीवरील गौरव जाहीर करण्यात आला आहे.
      या सन्मानाच्या घोषणेमुळे पत्रकारिता क्षेत्रासह सामाजिक वर्तुळातून त्यांचे अभिनंदन होत असून, विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक बाळकृष्ण कासार यांच्या 'सिंदूर' या दिवाळी अंकाला महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघाकडून पुरस्कार

मुंबई (शांताराम गुडेकर):  लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक बाळकृष्ण कासार यांच्या 'सिंदूर' या दिवाळी अंकाला महाराष्ट्र मुक...