आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, ८ जानेवारी, २०२६

जी.के.एस.कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९५ वी. जयंती उत्साहात साजरी

मुंबई (शांताराम गुडेकर): जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली येथे महाविद्यालयाच्या संचालिका सौ.कविता शिकतोडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा.प्रशांत तांदळे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंती साजरी करण्यात आली. शिक्षणप्रसारासाठी त्यांनी केलेल्या अतुलनीय कार्याला आदराने वंदन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नीता वाघ मॅडम यांनी केले.
             कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.जी.सागर सर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर, प्राचार्यांनी आपल्या भाषणात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. त्यांनी सांगितले की, सावित्रीबाईंनी त्या काळच्या सामाजिक विरोधाला न जुमानता महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. देशातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांचा गौरव केला जातो आणि त्यांच्या योगदानामुळेच आज स्त्रिया शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकल्या आहेत.
      कार्यक्रमाच्या शेवटी, प्रा.शेख सर यांनी उपस्थित सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे आभार मानले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून, सावित्रीबाईंच्या कार्याचा वारसा पुढे चालवण्याचा संकल्प सर्वांनी केला. अशा प्रकारे, एका प्रेरणादायी वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

श्री म्हसोबा देवस्थान उत्सवाचे आयोजन

मुंबई (पी.डी.पाटील): मेघवाडी, डॉ. एस्. एस्. राव रोड, लालबाग, मुंबई येथील श्री म्हसोबा मंदिर समिती व मेघवाडीतील रहिवाश्यांच्या वतीने गुरुवा...