मुंबई (शांताराम गुडेकर): घाटकोपर पूर्व कडील रामेश्वर मंदिर लक्ष्मीनगर शेजारी रहाणाऱ्या रिटा कांबळे (वय -63 वर्ष) या वयोवृद्ध महिला त्यांच्या राहत्या घरी वरच्या माल्यावरून पडून अपघातग्रस्त झाल्या.सदर घटनेनंतर शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी प्रसाद कामतेकर यांनी वारंवार फोन करुन देखील सरकरी 108 रुग्णवाहीका वेळेवर पोहचू शकली नाही. यांनंतर कामतेकर यांनी शिव आरोग्य सेनेचे मुंबई समन्व्यक प्रकाश वाणी यांना मदती साठी बोलावले. प्रकाश वाणी, शिक्षकेतर सेनेचे राज्य सचिव सचिन भांगे, शाखाप्रमुख विशाल चावक शाखा संघटक चंद्रकांत हळदणकर, लोकेश फेपडे यांना यानी घटना स्थळी धाव घेत पंतनगर पोलिस ठाणेंच्या वपोनि लता सुतार यांच्याशी संपर्क साधला त्यांनी त्वरित पोलिस वायरलेस मदती करिता पाठवली,वायरलेस गाडी सह एएसआय संजय कदम यांनी त्यांच्या टीम सह घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर शिवसैनिक व स्थानिक महिलांच्या मदतीने राजावाडी रुग्णालय गाठले व सदर महिलेवर योग्य उपचार सुरु करण्यात आले. सदर महिलेचे पोलिस व शिवसैनिकांमुळे प्राण वाचले असे विभागातील जनता बोलत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
उरणची आंतरराष्ट्रीय नेमबाज सुवर्ण कन्याने पटकाविले दोन टीम सुवर्ण व दोन वैयक्तिक दोन कांस्यपदक
गडब (अवंतिका म्हात्रे) दिनांक 16 डिसेंबर 2025 ते 5 जानेवारी 2026 दरम्यान डॉ. कर्णिसिंग शूटिंग रेंग दिल्ली येथे झालेल्या 68 व्या...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा