आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २५ डिसेंबर, २०२५

आपला समृद्धी मार्ग आपणच तयार करायचा असतो...!अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त पुष्करिणी सुभेदार यांचे मार्गदर्शन

मुंबई(शांताराम गुडेकर): जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर दगडधोंड्यातून वाट काढत आपला समृद्धी मार्ग आपणच तयार करायचा, या शब्दात समता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा पुष्करिणी सुभेदार यांनी साकीनाका येथे आयोजित कार्यक्रमात शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
          समता शिक्षण संस्थेचे सचिव राजेश सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थेच्या कार्याध्यक्ष, मुख्याध्यापिका ज्योती सुभेदार यांच्या देखरेखित आई पुष्करिणी सुभेदार यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचा सन्मान कार्यक्रम परेरावाडी येथील समता विद्या मंदिर शाळेमध्ये आयोजित करण्यात आला होता. आपल्या मार्गदर्शनात पुष्करिणी मॅडम पुढे म्हणाल्या कि आपले लक्ष्य गाठण्यासाठी प्रचंड आत्मविश्वास, कष्टाची तयारी आणि संयम बाळगला पाहिजे. अन्यथा पदरी नैराश्य पडते. आपल्या मातापित्यांचा योग्य रीतीने सांभाळ केला पाहिजे. वृद्धाश्रमात वृद्धांची संख्या वाढणे ही दुःखद बाब असल्याचे पुष्करिणी सुभेदार यांनी यावेळी सांगितले. साकीनाकासारख्या निम्न मध्यमवर्गीय वस्तीत शाळा सुरू करणे हे त्याकाळी एक दिव्यच होते. शाळेऐवजी चाळी बांधल्या असत्या तर अधिक फायदा झाला असता. पण विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता शाळा अधिक गरजेची होती. शाळा सुरू करताना जितका त्रास झाला त्यापेक्षा अधिक त्रास शाळा कशी चालवायची हे शिकण्यासाठी अधिक त्रास झाला. तरी त्या परिस्थितीत विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडवणारे शिक्षक संस्थेला लाभले हे संस्थेचे भाग्य आहे, असे म्हणत त्यांनी शिक्षकांचे आभार मानले. या सोहळ्यात लहान बालकांनी पुष्पवृष्टी करत मॅडमचे स्वागत केले. शिक्षकांनी ७५ दिव्यांनी मॅडमची ओवाळणी करून रवा गुळाची तुला केली. या दरम्यान विध्यार्थ्यानी नूत्य आणि संगीताचा कार्यक्रम सादर केला. या सोहळ्यात नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार, मायकल हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या संचालिका श्रीमती गोम्स मॅडम, संस्थेच्या संचालिका, रोहिणी उर्फ सलोनी सुधीर कुडाळकर, माजी मुख्याध्यापक सुदाम वाघमारे, श्रीमती. गीता बलोदी, पर्यवेक्षक अनिल सिंग, मुख्याध्यापिका भारती पोवाले, समता विद्या मंदिर मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमातील सेवानिवृत शिक्षक , शिक्षिका आणि माजी विद्यार्थी इन्स्पेक्टर गणेश अंधे, श्रीधर एरंडे, आबा पेंडणेकर, रात्र शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. वंदना निकम, नवनीत प्रकाशनचे अधिकारी, सर्व विभागाचे मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सावित्रीबाई फुले शाळा आणि कॉलेज, ट्युलिप इंग्रजी माध्यम शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदिसह अन्य मान्यवर मंडळींनी उपस्थित राहून सुभेदार मॅडम यांना शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रमोद कर्नाड यांना ‘बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५’ जाहीर

नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख ) : बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व कवी प्रमोद कर्नाड यांना “बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अच...