आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २५ डिसेंबर, २०२५

क्रीडा महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो – डॉ. किशोर पाटील

भिवंडी महानगरपालिका शाळा क्र. ४५ आयोजित ‘उत्साह क्रीडा महोत्सव – २०२५’चे उद्घाटन संपन्न
मुंबई (शांताराम गुडेकर):  भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका शाळा क्रमांक ४५ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘उत्साह क्रीडा महोत्सव – २०२५’ या नावाने विविध क्रीडास्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन स्वराज तोरणचे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले.
          उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. किशोर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, क्रीडा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो. खेळाच्या माध्यमातून विद्यार्थी आपल्या शाळेचे, शहराचे व परिणामी देशाचे नाव उज्वल करू शकतात. आज विविध प्रकारचे खेळ उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी कबड्डी, खो-खो, लंगडी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, कुस्ती आदी कोणत्याही खेळात प्राविण्य मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले.
         या उद्घाटन सोहळ्यास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. विजय जोशी, उपाध्यक्ष श्री. निवृत्ती ऐनकर, सदस्य श्री. प्रदीप पाटील, सौ. भक्ती जोशी, श्री. तुकाराम वाघ, श्रीकांत भोईर, गणराज सापटे, अंकुश केदारी यांच्यासह नाट्यकलाकार श्री. गणेश वाघमारे, अनिकेत घोगरे, अनिरुद्ध (सह्याद्री अकॅडमी) आदी मान्यवर उपस्थित होते.
      शाळेचे मुख्याध्यापक श्री. गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. सदानंद म्हात्रे, श्री. संतोष कसार, श्री. राहुल हिंदराव, श्री. किरण काकडे, श्री. बाळू वाघ, सौ. स्वाती भोईर, लीना चौधरी, अनिता कसार, सुरेखा लांबोळे, लीना माळी, वंदना सोनवणे, मनस्वी पाटील, कांचन निकम, स्मिता वेखंडे, कांता बांगारे, ऋतुजा जाधव, शर्मिला म्हात्रे आदी शिक्षकांनी क्रीडा महोत्सवाचे उत्कृष्ट नियोजन व आयोजन केले आहे.
     या क्रीडा महोत्सवात १०० मीटर व ५० मीटर धावणे, रिले शर्यत, चमचा-लिंबू शर्यत, बेडूक उड्या, बटाटा शर्यत यांसह लंगडी, खो-खो, कबड्डी आदी सामने पुढील तीन दिवस मोठ्या उत्साहात खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धांमधील सर्व विजयी विद्यार्थ्यांना वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्वाती भोईर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. सदानंद म्हात्रे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रमोद कर्नाड यांना ‘बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५’ जाहीर

नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख ) : बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व कवी प्रमोद कर्नाड यांना “बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अच...