आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, ३१ डिसेंबर, २०२५

प्रमोद कर्नाड यांना ‘बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५’ जाहीर

नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख ) : बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व कवी प्रमोद कर्नाड यांना “बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५” जाहीर करण्यात आला आहे. हा सन्मान ३० जानेवारी २०२६ रोजी, नोव्होटेल हॉटेल, इमॅजिका, खोपोली येथे आयोजित टॉप १०० CXO बँकिंग समिटमध्ये प्रदान करण्यात येणार आहे.
    या पुरस्काराद्वारे श्री. कर्नाड यांच्या अनेक दशकांच्या प्रदीर्घ, निष्ठावान व मूल्याधिष्ठित बँकिंग सेवेला गौरविण्यात येत आहे. ग्रामीण व सहकारी बँकिंग, संस्थात्मक विकास, नेतृत्व आणि मार्गदर्शन या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.
या प्रसंगी प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री. कर्नाड म्हणाले की, “हा सन्मान केवळ माझा नसून, माझ्या संपूर्ण बँकिंग प्रवासात मला मार्गदर्शन, पाठबळ व प्रेरणा देणारे आदरणीय शरद पवारसाहेब, मा. अजितदादा पवार, मा. दिलीपजी वळसे पाटील, मा. प्रवीणभाऊ दरेकर, मा. काशिनाथजी मोरे, मा. देवेंद्रशेठ शहा, मा. गोयलसाहेब (IAS), मा. अग्रवालसाहेब (IAS), कै. विष्णुआण्णा पाटील, सहकार महर्षी कै. शामराव भिवाजी पाटील तसेच माझे गुरूजन, सहकारी संस्था, वरिष्ठ अधिकारी, सहकर्मचारी व हितचिंतक — या सर्वांचा हा सामूहिक गौरव आहे.”
      राष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठित बँकिंग समिटचे आयोजन इव्हेंटॅलिस्ट्स (E Plus Media) या संस्थेने केले असून, आयोजकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल व या प्रवासात लाभलेल्या प्रत्येक शिकण्याच्या संधीबद्दल श्री. कर्नाड यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
      आपल्या यशामागे आई-वडिलांचे आशीर्वाद, भावंडांचे प्रेम आणि पत्नीची मोलाची साथ या घटकांचा विशेष वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रमोद कर्नाड यांना ‘बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५’ जाहीर

नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख ) : बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व कवी प्रमोद कर्नाड यांना “बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अच...