मुंबई (सतीश पाटील): महाराष्ट्र मध्ये नावारूपाला आलेली गावदेवी युवा मित्र मंडळ आयोजित शिस्तबद्ध नवी मुंबई मानाची पालखी म्हणजेच जुईनगर ते श्री तीर्थ क्षेत्र एकविरा पदयात्रा सोहळा नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच दिनांक ४जानेवारी २०२६ रोजी नवी मुंबई जुईनगर मधून कारल्याला प्रस्थान करणार आहे. यंदा हे पालखीचे पदयात्रीचे 14 वर्ष असून 2000 हून अधिक पदयात्री सहभागी होणार आहेत. पालखी जुईनगर वरून येताना तब्बल 500 हून अधिक वादक हे ब्रास बँड पालखीला मानवंदना देणारे हे महाराष्ट्रातील एकमेव मंडळ आहे. चारही सागरी जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील देखील आई एकविरा भक्त या पालखी सोहळ्यामध्ये दरवर्षी मोठ्या भक्ती भावाने सहभागी होतात.
चार दिवसीय पालखी सोहळ्यात विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम वस्तीच्या ठिकाणी साजरे होतात.त्यामध्ये साईबाबांची गाणी,आगरी कोळी पारंपरिक गीतांचे विविध कार्यक्रम व कार्ला देवस्थान या ठिकाणी शेवटची वस्ती असते. जल्लोषात आईच्या पालखीचा हा मोठा कार्यक्रम आर्केस्ट्रा स्वरूपात संपन्न होतो. त्यात 100 हून अधिक कलाकार सहभागी होतात.पालखीतील एकूण 150 स्वयंसेवक पदाधिकारी दोन महिने अहो रात्र मेहनत घेत असतात. प्रत्येक मंडळ व देवस्थान ला निमंत्रण प्रत्यक्षात दिले जाते.आज संपूर्ण महाराष्ट्रात शिस्तबद्ध नवी मुंबई ची मानाची पालखी म्हणून ख्याती आहे.अशी माहिती संस्थापक /अध्यक्ष शैलेश भोईर व पालखी प्रमुख बंटी म्हात्रे यांच्याकडून देण्यात आली. "जय एकविरा आई."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा