आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ३० डिसेंबर, २०२५

निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ, पुणे येथील राज्यस्तरीय अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा होणार उत्साहात संपन्न ;"राज्यस्तरीय अधिवेशनात पत्रकारांची उपस्थिती प्रेरणादायी" युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार

गडब ( अवंतिका म्हात्रे):  ग्रामीण पत्रकाराला एखाद्या वृत्तपत्रात काम करताना किती अडीअडचणींचा सामना करावा लागतो तसेच पत्रकारिता करीत असताना समाजातील समाजकंटकांकडून पत्रकार बांधवांवर होणारे भ्याड हल्ले या सर्व बाबीची दखल घेऊन युवा ग्रामीण पत्रकार संघाची मुहूर्तमेढ रोवून तसेच समाजातील प्रत्येक घटकांच्या, न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेली, भारतातील एकमेव संघटना म्हणजे युवा ग्रामीण पत्रकार संघ, आज महाराष्ट्र बरोबरच संपूर्ण देशात अग्रेसर असल्याने, महाराष्ट्र राज्यातील राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा २०२६ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे, तरी निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ परिवारातील सर्व पत्रकार बांधवांनी होणाऱ्या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे युवा ग्रामीण पत्रकार संघांचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश भाऊ कचकलवार यांनी सांगितले.
      अतिशय कमी कालावधीत फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतभर जिल्हा, तालुका व सर्कलनुसार आज युवा ग्रामीण पत्रकार संघ स्थापन करून जिथे छोट्या मोठ्या, ग्रामीण आणि शहरी भागातील पत्रकारांना वेगवेगळा दर्जा मिळत असल्याने, त्यांनी जि संकल्पना करून पूर्ण महाराष्ट्र तसेच भारतभरात कुठल्याही लहान मोठ्यांचा भेद नं करता सर्व पत्रकारांना सोबत घेऊन चालण्याचा जो विडा उचलेला आहे त्यास आज खरोखरच महाराष्ट्र व देशात यश मिळाले आणि याचे खरे कारण म्हणजे निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून गोर गरीब जनतेला सर्वतोपारी मदत होत असल्याने या संघटनेमध्ये राष्ट्रभरातून पत्रकार जुळलेले आहेत आणी एवढेच नव्हे तर भविष्यात संपूर्ण जगभरात निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना करू असे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेशभाऊ कचकलवार यांनी यावेळी सांगितले.
    समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी, गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटने मार्फत संपूर्ण देशभरात एक हेल्पलाइन नंबर सुरू केला असून त्या माध्यमातून 'एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व' ही मोहीम राबविली जात आहे आणि त्या माध्यमातून पत्रकारांबरोबरच गोरगरीब जनतेच्या समस्यांचे निराकरण झालेले आहे. गोरगरीब जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे व संपूर्ण महाराष्ट्र हा भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे यासाठी निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ संचलित माहिती अधिकार संघ, समाजकार्य संघ, पोलीस मित्र संघ व इतर संघाच्या माध्यमातून 'गाव तिथे शाखा' अशी संघटनेची बांधणी असणार आहे.
     ६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, पुणे येथे राज्यस्तरीय अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा, पुणे जिल्हा टीमच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे, येथे पत्रकारिता क्षेत्रातील तसेच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, कृषी, उद्योग, साहित्य, कला, अध्यात्म, आरोग्य व इतर विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्यास विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरातील निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ परिवारातील सर्व पत्रकार बांधवांनी सदरील कार्यक्रमाला उपस्थित राहावे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रमोद कर्नाड यांना ‘बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५’ जाहीर

नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख ) : बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व कवी प्रमोद कर्नाड यांना “बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अच...