आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ३० डिसेंबर, २०२५

महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघामार्फत पत्रकार दिनाचे आयोजन ; रौप्य महोत्सवी वाटचालीनिमित्त होणार ज्येष्ठ व अनुभवी संपादकांचा सत्कार !!

मुंबई(पंकजकुमार पाटील): मराठी वृत्तपत्रसृष्टीमध्ये आद्य पत्रकार म्हणून संपादक आचार्य बाळशास्त्री जांभेकर ओळखले जातात. दिनांक ६ जानेवारी १८३२ रोजी त्यांनी आपल्या "दर्पण" या नियतकालिकाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे या दिवसाचे विशेष महत्व लक्षात घेऊन  हा दिवस  ”पत्रकार दिन” म्हणून ओळखला जातो. या दिवशी जांभेकरांच्या पत्रकारितेचे स्मरण करून सर्व पत्रकार, माध्यम प्रतिनिधी व पत्रकारांच्या संस्था, संघटना हा "पत्रकार दिन " सगळीकडे मोठया उत्साहात साजरा करतात.
        याच दिवसाचे औचित्य साधून मुंबई व महाराष्ट्रात नावाजलेला महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघमार्फत देखील एका छान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ जानेवारी रोजी बी. आर. दंडवते सभागृह, महाराष्ट्र हायस्कूल शेजारी, ना.म.जोशी मार्ग करी रोड(प), मुंबई याठिकाणी सायंकाळी ६ - १० या वेळेत हा कार्यक्रम साजरा होईल. सध्या संघाची २५ व्या वर्षाकडे (रौप्य महोत्सवी )वाटचाल सुरु आहे. त्यामुळे या निमित्ताने सदर कार्यक्रमात पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य केलेल्या महाराष्ट्रातील अनुभवी,ज्येष्ठ व श्रेष्ठ अशा २५ संपादक मंडळींचा यथोचित सत्कार सोहळा केला जाणार आहे. तसेच पाच दिवाळी अंकाचा सन्मान देखील यावेळी करण्यात येणार आहे. वरील सत्कारमूर्ती संपादक यांच्यासह व दिवाळी अंकाच्या संपादक महोदयांचा  सन्मान चिन्ह सन्मानपत्र व शाल श्रीफळ देऊन  सन्मानित केले जाणार आहे.  या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार व दैनिक सागर चे संपादक सन्मा.डॉ. सुकृत खांडेकर, दैनिक लोकसत्ता चे संपादक ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर,सौ. जयश्री ताई अहिरराव (विश्वस्त- महिला विकास मंडळ, कुलाबा, मुंबई )यांच्यासह अन्य मान्यवरांची मुख्य उपस्थिती लाभणार आहे. 
       तेव्हा महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाच्या या कार्यक्रमासाठी सर्व पदाधिकारी यांच्यासह सभासद तसेच विविध माध्यम क्षेत्रातील पत्रकार यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क :9892994121/ 9969735445 /8850445949

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रमोद कर्नाड यांना ‘बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५’ जाहीर

नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख ) : बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व कवी प्रमोद कर्नाड यांना “बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अच...