आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २९ डिसेंबर, २०२५

सुप्रसिद्ध गायक जगदीश पाटील यांची शिर्डी देवस्थानच्या साईचरणी सेवा अर्पण ; ३१ डिसेंबर रोजी भक्तीगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन


मुंबई  (सतीश पाटील): नवीन वर्ष व जाणारे जुने वर्ष याची सांगड म्हणून सगळीकडे लगबग असते. ३१ डिसेंबर ला जुन्या वर्षाला निरोप दिला जातो आणि येणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात म्हणून सर्वत्र जल्लोष साजरा केला जातो. अशातच एक अवलीया, सुप्रसिद्ध गायक कलाकार तसेच आपल्या सुमधूर व आपल्या ढंगात सर्वाना ठेका धरून लावणारा कलाकार श्री. जगदीश पाटील यांचा वाढदिवस १ जानेवारी ला असतो. त्यांच्याकडून गेली १६ वर्षे अविरत साई देवस्थान शिर्डी येथे भक्तीगीतांचा कार्यक्रम राबवला जातो.कोणी नवीन वर्ष, वाढदिवस साजरे करायला पिकनिक, रिसॉर्ट येथे जातात.मात्र गायक जगदीश पाटील हे साईभक्त शिर्डी येथे साजरी करून नविन वर्षाचे स्वागत करतात.आणि आपल्या साईभक्ती गीताने भाविकांचे मनापासून मनोरंजन करून स्वतःला कृतज्ञ समजतात. 🕉️साईराम. मुंबई पत्रकार श्री.सतिश पाटील व  संपादक आदर्श वार्ताहर व टीमकडून तसेच चाहत्यांकडून जगदीश पाटील दादांना वाढदिवसाच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रमोद कर्नाड यांना ‘बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५’ जाहीर

नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख ) : बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व कवी प्रमोद कर्नाड यांना “बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अच...