प्रतिनिधी : महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांचे श्रद्धास्थान तसेच आराध्यदैवत असणाऱ्या पंढरपूर येथील सुप्रसिद्ध अशा श्री विठ्ठल रखुमाई विठ्ठल मंदिरात डोंबिवली येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सौ वेदश्री वैभव ओक यांचे सुश्राव्य असे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.याप्रसंगी त्यांना पेण रायगड येथील विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम, उत्सवात कीर्तन सेवा देण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या श्री. शांताराम गजानन पाटील यांनी हार्मोनियमची साथ तर श्री सुभाष शांताराम पाटील यांनी तबल्याची साथ संगत दिली. विशेष म्हणजे या पिता -पुत्रास या मंदिरात श्री विठ्ठल कृपेने हार्मोनियम व तबल्याची साथ द्यायला एकत्र येऊन किर्तन सेवा देण्यासाठी एक चांगला योगायोग जुळून आला. वयाची पंचाहत्तरी पार करूनही शांताराम पाटील यांनी मुलाच्या साथीने चांगल्या प्रकारे सेवा दिली.
सदर कीर्तनसेवा दिल्याबद्दल कीर्तनकार तसेच पाटील पिता पुत्रांचा कमिटीच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा