आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, ३१ डिसेंबर, २०२५

दादरमध्ये शिवोत्सवाचे आयोजन

मुंबई (रवींद्र मालुसरे ) : श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने दादर पश्चिम येथील धुरू हॉल मध्ये रविवार दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी संघ्याकाळी ५ ते ८.३० पर्यंत शिवोत्सव - २०२६ आयोजित करण्यात आला आहे. पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय महाराष्ट्र राज्याचे संचालक डॉ तेजस गर्गे हे जागतिक वारसा स्थळे १२ किल्ले जबाबदारी : सरकारची आणि आपली या विषयावर तर शंभू व्याख्याते अक्षय चंदेल यांचे मला समजलेले छत्रपती संभाजी महाराज या विषयावर व्याख्यान होणार आहे. ज्येष्ठ इतिहास संकलक लेखक दुर्गमहर्षी आप्पा परब यांना जीवन गौरव सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शिवदुर्ग मित्र (लोणावळा),डेला ऍडव्हेंचर (लोणावळा ), यशवंती हायकर्स (खोपोली ), निसर्ग मित्र (पनवेल ), नासिक क्लाइंबर्स अँड रेस्क्यूअर्स असोसिएशन (NCRA) या रेस्क्यू संस्थांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मोडी लिपी निबंध स्पर्धा, शिवबावनी कथन स्पर्धा, गडकिल्ले छायाचित्रण स्पर्धा यांचा पारितोषिक वितरण समारंभ सुद्धा यावेळी होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून शिवप्रेमी आणि इतिहासाच्या अभ्यासकांनी या कार्यक्रमास अगत्याने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे प्रमुख डॉ.हेमंतराजे गायकवाड यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रमोद कर्नाड यांना ‘बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५’ जाहीर

नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख ) : बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व कवी प्रमोद कर्नाड यांना “बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अच...