शाखेचे सरचिटणीस श्री.प्रदिप धुमक यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे व समाजबांधवांचे स्वागत केले.मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून समाजनेते यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्याचबरोबर मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष श्री.अनिलजी द.नवगणे उपस्थित होते.त्यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यांनी समाजाला मोलाचे मार्गदर्शन केले.९ऑक्टोबरच्या मोर्चाचा उल्लेख करताना हा संघर्ष इथे संपलेला नाही तर हे आंदोलन गावा गावात पोहचले पाहिजे कारण हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे त्याला सहज जाग येणार नाही.त्यामुळे संगमेश्वर शाखेने हा जो दिनदर्शिकेचा कार्यक्रम हाती घेतला आहे तो एक चांगला उपक्रम समाज बांधव यांच्या घरापर्यंत पोहचण्यासाठी उपयोगी पडणार आहे.संघाची अशी एकच शाखा आहे की ८००० दिनदर्शिका या सर्व समाजबांधवांना मोफत देण्यात येणार आहेत.हे मोलाचं काम शाखा करित आहे.त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या.त्याच बरोबर संघाचे सरचिटणीस श्री.कृष्णा वणे व उपाध्यक्ष श्री.बबन उंडरे यांनीही मार्गदर्शन करून शाखेला शुभेच्छा दिल्या.
यावेळी गावावरुन उपस्थित राहिलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष,श्री.संतोष थेराडे यांनी मार्गदर्शन करताना दिनदर्शिकेला शुभेच्छा दिल्या व येणाऱ्या जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीत सर्व समाजबांधव एकत्रित येऊन जास्तीत जास्त समाज बांधव निवडून आणण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न केला पाहिजे असे आव्हान केले आहे.संगमेश्वर तालुका कुणबी सहकारी पतसंस्थे अध्यक्ष मा. श्री.शातांराम सालप, श्री.शांताराम गोरूले,कुणबी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.शंकर शिगवण.यांनीही मार्गदर्शन करून दिनदर्शिकेला शुभेच्छा दिल्या. संघ कार्यकारिणी सदस्य श्री.सुरेश कानाल,श्री.रमेश कानावले, श्री.संजय गोंधळी श्री.विष्णू सनगरे, श्री.संतोष टक्के कुणबी समाजोन्नती संघ युवाचे सरचिटणीस श्री.सचिन रामाणे,कुणबी समाजोन्नती महिला मंडळ उपाध्यक्षा सौ.स्मिता गोंधळी, शाखेचे उपाध्यक्ष श्री.प्रभाकर धनावडे,श्री.संजय बारगुडे, श्री.शांताराम घागरे, शाखेचे सहसचिव श्री.प्रदिप घेवडे,श्री.अनंत नाचरे, खजिनदार श्री.तुकाराम डावल शाखेचे युवक मंडळ अध्यक्ष श्री.संदिप गिते,सरचिटणीस श्री प्रमोद घेवडे शाखेचे मार्गदर्शक श्री.विठ्ठल गिडये व सौ.वैशाली गिडये,विरार शाखेचे प्रचार प्रमुख श्री.शैलैश दळवी त्याच बरोबर कार्यकारिणी चे सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.शेवटी शाखेचे अध्यक्ष श्री.संजय गोंधळी यांनी मार्गदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा