गुरुवार, २५ डिसेंबर, २०२५
पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्याला अभिवादन
पोंभुर्ले(गुरुनाथ तिरपणकर): l दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची६ जानेवारी रोजी जयंती आहे.या दिवशी पत्रकार संघटना त्यांची जयंती उत्साहात साजरी करतात.त्याच अनुषंगाने जनजागृती सेवा संस्था गेली चार वर्षे विविध शहरातील पत्रकारांचा सत्कार करत असते.यावेळीही कोकणात पत्रकारांचा सत्कार होणार आहे.त्याअगोदर६जानेवारी या पत्रकार दिनाचे औचित्य साधून जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने पोंभुर्ले,ता.देवगड, जिल्हा.सिंधुदुर्ग येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाला भेट दिली.पोंभुर्ले हे त्यांचे मूळ जन्म गाव.याप्रसंगी जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.संस्थेचे पत्रकारितेतील सन्मानपत्र व संस्थेचा पंचवार्षिक अहवाल त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन समर्पित करण्यात आला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खारेपाटण ज्युनिअर कॉलेजचे प्रा.सुबोध देसाई, कणकवली एस.टी.विभागीय कार्यालयाचे सेवा निवृत्त वाहतूक निरिक्षक प्रकाश साखरे उपस्थित होते.या प्रमुख पाहुण्यांचा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व आभार पत्र देऊन सत्कार करण्यात आला.तसेच सभागृहातील फोटो, माहिती जाणून घेतली.या कार्यक्रमासाठी ज्युनिअर कॉलेज खारेपाटणचे प्राचार्य श्री.संजय सानप, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रविण शेठ लोकरे, ज्युनिअर कॉलेज खारेपाटणचे प्रा.अजय गुरसाळे यांचे विशेष सहकार्य लाभले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रमोद कर्नाड यांना ‘बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५’ जाहीर
नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख ) : बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व कवी प्रमोद कर्नाड यांना “बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अच...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा