आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १६ नोव्हेंबर, २०२५

व्यसनमुक्त पिढी घडविण्यासाठी लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई तर्फे व्यसनमुक्त शिबिराचे आयोजन

 नवी मुंबई : व्यसनामुळे विद्यार्थीदशेत युवा पिढी वाया जात आहे. दारू किंवा अमली पदार्थाचा वापर केला जातो. पैशांचा गैरवापर, मार्गदर्शनाचा अभाव, उत्सुकता, संगत अशा काही कारणांमुळे व्यसनाधीनता हा मानसिक रोग होत व्यसन आणि त्याचे दूरगामी परिणाम माहीत असून त्यापासून परावृत्त वेस्टर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अँड बिझनेस मॅनेजमेंट आणि लायन हार्ट ग्रुप, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती कार्यशाळेचे आयोजन बुधवारी आता १५ नोव्हेंबर २०२५ रोजी विश्वेश्वर एज्युकेशन सोसायटीचेवेस्टर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अॅन्ड बिझसेन मॅनेजमेंट सेक्टर - ९, सानपाडा, नवी मुंबई येथे व्यसनमुक्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
      यावेळी मार्गदर्शन माननीय डॉ. अजित मगदूम (प्राचार्य आणि संचालक, अन्वय व्यसनमुक्ती केंद्र, वाशी) करतील. या कार्यक्रमाचे आयोजक श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे (लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईचे संस्थापक, नवी मुंबई भूषण पुरस्कार प्राप्त)हाज्जी शाहनवाज खान (सामाजिक कार्यकर्ते) समाजभषण श्री. उत्तम तरकसे आसरडोहकर (वरिष्ठ कवी, साहित्यिक विचारवंत, महाराष्ट्र पोलिस दल - नवी मुंबई गुन्हे शाखा) श्री. भीमसेन तपासे (अध्यक्ष, लुंबिनी वृक्ष संवर्धन संघटना, बेलापूर, नवी मुंबई) डॉ. मित्या वर्गीस (प्राचार्य, आय.आय.व्ही.एम. शिक्षण) विक्की वांडे (अभिनेता )यांनी अनेक मराठी मालिकेत काम केले आहेत दुर्वा, छोटी मालकिण, एक घर मंतरलेले ,सावधान इंडिया, आनंदी हे जग सारे, आणि हिंदी गाणी धूप का करझ , आणि इतर अनेक मालिकेत सुद्धा काम केले आहे सामाजिक कार्यकर्ते म्हणुन त्याना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे यांना 100 हून अधिक पुरस्काराने सन्मानित ), मा.रवीश मोमीन ( समाजसेवक ) वेस्टर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अँड बिझनेस मॅनेजमेंट चे व्यवस्थापन अभ्यास विभाग प्रमुख: सहाय्यक प्राध्यापक कझनफर खान व्यासपीठावर उपस्थित होते.तर विश्वेश्वर एज्युकेशन सोसायटीचेवेस्टर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अॅन्ड बिझसेन मॅनेजमेंट उपस्थित होते त्या विद्यार्थ्यांना लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई तर्फे प्रमाणपत्र देण्यात आले तसेच कार्यक्रमाप्रसंगी सहाय्यक प्राध्यापक सह एनएसएस कार्यक्रम अधिकारी: बरकाथू निशा.आर,सहायक प्राध्यापक: अभिषेक गुरव, सहायक प्राध्यापक: कुलदीप प्रभू ,प्रयोगशाळा सहाय्यक - संदेश पडवळ. मुख्याध्यापक,शिक्षक,सामाजिक संघटनांचे सदस्य उपस्थित होते.
    नवी मुंबई शहरातील विद्यार्थ्यांना व्यसनापासून दुर ठेवण्यासाठी घरोघरी जावून जनजागृती करणार असल्याचे मार्गदर्शन माननीय डॉ. अजित मगदूम (प्राचार्य आणि संचालक, अन्वय व्यसनमुक्ती केंद्र, वाशी) करतील. या कार्यक्रमाचे आयोजक श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे (लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईचे संस्थापक, नवी मुंबई भूषण पुरस्कार प्राप्त) यांनी प्रास्ताविकातून सांगितले. चटकन नशा, गुंगी आणणारे पदार्थ याचा वापर वाढला आहे आणि हे खूप महागडे यामध्ये अल्कोहोल, चरस, गांजा, सिगारेट, ड्रग्स, कोकेन, ओपीऑईडस् याशिवाय व्हाईटनर, ब्राऊन शुगर यांसारख्या वेगवेगळ्या नशा वेगवेगळ्या माध्यमातून करत असल्याचे आढळून येत आहे. याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होत आहे. याचा वापर मोठ्या शहरांमध्ये जास्त प्रमाणात होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रमोद कर्नाड यांना ‘बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५’ जाहीर

नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख ) : बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व कवी प्रमोद कर्नाड यांना “बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अच...