कोकणात एक पूर्वजांपासुन चालत आलेली प्रथा आहे की पाऊस पडला नाही किंवा पिण्याच्या पाण्याची कमतरता आली की येथील ग्रामस्थ रात्री अंगाला झाडे पाने लावुन गावभर नाचत गात धोंडबा काढत व त्या नंतर थोडे पाणी मंदिरात नेऊन ओततात. योगायोगाने किंवा दैवी चमत्काराने पाऊस पडायचा. म्हणून या अंदोलनाला धोंडबा अंदोलन नाव दिले आहे. कदाचित लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या मनात आले तर आमच्या खारेपाट भागातील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करतील. प्रकाश माळी, अध्यक्ष खारेपाट विकास संकल्प संघटना
मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०२६
वाशी शिर्की खारेपाट नागरीकांचा पिण्याच्या पाण्यासाठी १८ फेब्रुवारीला धोंडबा आंदोलन
पेण (प्रतिनिधी) तालुक्यातील वाशी शिर्की खारेपाट भागातील जनतेच्या पाचविला पुजलेल्या प्रलंबित पिण्याच्या पाणी प्रश्नासाठी १८ फेब्रुवारी रोजी खारेपाट विभाग विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून पेण येथील महात्मा गांधी मंदीर ते पेण प्रांत कार्यालय येथे असंख्य महीला व पुरुषा सह धोडबा अंदोलन करण्यात येणार आहे. पेण तालुक्यातील वाशी-शिर्की खारेपाटातील जनता गेल्या आठ वर्षांपासून हेटवणे धरण हाकेच्या अंतरावर आसताना तीन दिवसा आड पाणी पुरवठा सहन करत आहे. या धरणातून पिण्याचे पाणी नवी मुंबईला २४ तास पुरवठा होतो आणी या धरणावर प्रथम आधिकार असलेल्या खारेपाट भागातील नागरिकांना मिळत नाही. आता यापुढे तेच पाणी खारेपाटाला सात दिवस आड मिळणार आहे. कोट्यवधी रुपये खर्चुन योजना पूर्ण झाली, पाणी मुबलक आणि विपूल आहे, तरीही शेवटच्या गाव-वाड्यांमध्ये आजही पावसाचे साठवलेले अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आहे. हेटवणे धरणात वाशी-शिर्की खारेपाटासाठी गरजे पेक्षा अडीचपट अधिक पाणी उपलब्ध आसुन सुद्धा दररोज पाणी न देता, पिण्याचे पाणी तीन दिवसांत विभागून दिले जाते. म्हणजे ही टंचाई नैसर्गिक नाही, तर नियोजनाच्या अभावातून निर्माण करण्यात आलेली कृत्रिम पाणी टंचाई आहे. हे आंदोलन, ही लढाई पाण्यासाठी, आपल्या आरोग्यासाठी आपल्या सुकर भविष्यासाठी, दररोज, मुबलक आणि शुद्ध पाण्यासाठी. आपल्या मूलभूत हक्कासाठी आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
वाशी शिर्की खारेपाट नागरीकांचा पिण्याच्या पाण्यासाठी १८ फेब्रुवारीला धोंडबा आंदोलन
पेण (प्रतिनिधी) तालुक्यातील वाशी शिर्की खारेपाट भागातील जनतेच्या पाचविला पुजलेल्या प्रलंबित पिण्याच्या पाणी प्रश्नासाठी १८ फेब्...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा