प्रतिनिधी ठाणे (भूषण सहदेव तांबे): साहित्यिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची दखल घेत नवी मुंबईतील कवी/लेखक/पत्रकार प्रदीप बडदे यांना नुकताच स्वतंत्र कोकण राज्य अभियान यांच्या वतीने कोकणरत्न पदवी सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य उपेक्षितांचे या मासिकाचे ते कार्यकारी संपादक असून नुकत्याच दिवाळीत प्रकाशित झालेल्या छायांकित दिवाळी अंकासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. यांसह मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक व गुजरात येथील विविध साहित्यिक मंचावर संचालक व मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. प्रदीप बडदे हे गेल्या वीस वर्षांपासून साहित्यक्षेत्रात कार्यरत असून त्यांना राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व राष्ट्रस्तरीय अशी ५० हून अधिक पारितोषिके व पुरस्कार प्राप्त आहेत.
कोकण रत्न पदवी प्रदान सोहळा दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदानाशेजारी, मुंबई येथे संस्थापक मा.संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पत्रकार, संपादक मा.सचिन कळझुनकर सर तेथे आवर्जून उपस्थितीत राहणार आहेत. श्री. प्रदीप बडदे यांच्या या सन्मानाबद्दल साहित्यिक क्षेत्रात कौतुक होत असून मित्रपरिवारतर्फे व हितचिंतकांकडून शुभाशिर्वाद आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा