गरिबी वाईट असते गरिबांपर्यंत पोहचा ,
ज्या झोपडीत अंधार आहे तेथे प्रेमाचा दिवा लावा...
दिवाळी म्हणजे अंधारात उजेड निर्माण करा , तुमच्या आयुष्याचा मूठभर उजेड त्या झोपडी पर्यंत जावू दया....
तुमच्या खाऊतील दोन घास देऊ करा ,
मी अनाथांची माय झाले तुम्ही गणगोत व्हा,
आपण दुःख वाटून घेऊया...
थोर समाज सेविका,पद्मश्री सिंधू ताईंच्या वक्तव्याचा आदर्श घेत व दीपावली सणाचे औचित्य साधत पहिला उपक्रम सिंधुताई च्या आश्रमात दीपावली फराळ वाटप करण्यात आले.
तर दुसऱ्या कार्यक्रमात कांजूरमार्ग (पूर्व )येथील स्वच्छता कामगारांस मिठाई वाटप करण्यात आली. तर तिसरा उपक्रम नाशिक इगतपुरीतील ,पिंपळगाव येथे गरजू गरिबांसाठी फराळ - कपडे - खेळणी - अन्न धान्य वाटप करून खऱ्या अर्थाने चेहऱ्यावर हास्य दिसावे या हेतूने प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला.
सदर उपक्रमाचे 12 वे वर्ष असून यावेळी प्रमोद कांडरकर ,दत्तात्रेय पडवळ , सचिन पवार , नरेश करलकर , संस्थापक सुरज बांदकर उपस्थित होते. सदर प्रसंगी लाभार्थींनी आभार व्यक्त करत संस्थेच्या पुढील उपक्रमास शुभेछा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा