पेण (प्रतिनिधी): वैश्विक उर्जेद्वारे स्वतःला शक्तीमान बनवा, मनोवांच्छित मिळवा. 'रेकी' हा जापनीज शब्द आहे. 'रे' म्हणजे 'प्राण' किंवा वैश्विक उर्जा आणि 'की' म्हणजे 'शक्ती' / चैतन्य / एनर्जी. ही ब्रह्मांडातील सकारात्मकशक्ती आपण घेऊन दुसऱ्याला देऊ शकतो. ह्या शक्तीद्वारे अनेक समस्या व व्याधीपासून केवळ हाताच्या स्पर्शाने मुक्तता मिळवता येते. ब्रह्मांडातील उर्जाद्वारे शारीरिक व मानसिक संतुलन राखण्याची ही एक टेक्निक आहे. एकूण काय तर धूसर असलेली उत्कर्षाची पायवाट स्पष्ट दिसू लागते.
हिच रेकी साधना जाणून घेण्याच्या व अभ्यास करण्याच्या दृष्टीने रेकी ग्रॅन्ड मास्टर मृणालताई परब तसेच हिलर प्रा. भाऊ म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 4 व 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते 5 वा. पर्यंत राधाकृष्णवाडी-बारीवाडी रोड, पोस्ट- आंबेघर, तालुका पेण, जिल्हा- रायगड याठिकाणी दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक असून अंतिम प्रवेश दि. 2 नोव्हेंबर पर्यंत निश्चित करता येईल. सदर शिबिरासाठी छापील कोर्स टिप सह देणगी मूल्य रु. 700/- फोन पे / गुगल पे याद्वारे 8983011737 या नंबरवर करता येईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा