पुणे :(प्रतिनिधी) वृत्तपत्र लेखनातील पत्रकारितेसोबत सामाजिक क्षेत्रातील सेवाभावी वृत्ती व निवृत्तीनंतरच्या जीवनातही या क्षेत्रात सक्रिय राहण्याच्या या त्यांच्या कारकिर्दीची दखल घेऊन,भविष्यातही असेच कार्यरत राहण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट,क्रीडा मंत्रालय-केंद्र सरकार व निती आयोग संलग्नित,दिल्ली नामांकित डॉ.रविंद्र भोळे आरोग्य केंद्र यांच्या वतीने मोठ्या सन्मानाचा आणि अत्यंत प्रतिष्ठतेचा भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार,हा राष्ट्रीय पुरस्कार श्री.सुनील इंगळे यांना प्रदान करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा राज्यसभा खासदार प्रा.डॉ.मेघाताई कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष हिंदूरत्न सन्माननीय डॉ.रविंद्र भोळे (अध्यक्ष-मणिभाई मानव सेवा ट्रस्ट) यांच्यासोबत विविध क्षेत्रातील मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
भारताचे पहिले गृहमंत्री,भारतरत्न,भारताचे एकमेव लोहपुरुष यांनी अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशातील 560 संस्थानांचे विलीनीकरण करून एक संघ भारत निर्माण करणाऱ्या या महापुरुषाच्या 150 व्या जयंतीदिनी,राष्ट्रीय एकता दिनी मला त्यांच्या नावाने हिंदूरत्न पुरस्कार प्राप्त झाला,त्यामुळे मी धन्य झालो आहे,मी हिंदू असल्याचा मला अभिमान आहे.या सर्व प्रवासात मला आजपर्यंत मार्गदर्शन करणारे माझे गुरु,माझे स्नेही,माझे सहकारी मित्र त्यांच्यामुळेच मी आज या सुंदर क्षणाचा आनंद उपभोगीत आहे,त्यामुळे याप्रसंगी त्या सर्वांचेही मी मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोअसे मत सुनील इंगळे यांनी व्यक्त केले.तसेच सुनील इंगळे हे गेली 40 वर्षे सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक संस्थांची त्यांचे जवळचे संबंध आहेत. बहिणाई चॅरिटेबल ट्रस्टचे ते संस्थापकअध्यक्षअसून,बहिणाई वार्तापत्र चे संपादक आहेत,जीवनदाता सामाजिक संस्था,जायन्टस क्लब,जनजागृती सेवा समिती,ग्लोबल खान्देश मंडळ,पत्रकार उत्कर्ष समिती,प्रेरणा फाउंडेशन, महाराष्ट्र गौरव परिवार,मुंबई व उपनगरातील लेवा पाटीदार मंडळात ते कार्यरत असतात,स्वतः नेत्रदान व देहदानाचा संकल्प करून इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे.आज पर्यंत 70 पेक्षा अधिक पुरस्कारांचे ते मानकरी झाले आहेत.अशा आगळ्यावेगळ्या समाजाभिमुख,लोकाभिमुख व्यक्तिमत्त्वाचे समाजातील विविध स्तरातून कौतुक होत आहे व भावी उपक्रमांसाठी समाजातील मान्यवरांनी,मित्र परिवारांनी,शुभचिंतकांनी त्यांना शुभेच्छा दिल्याआहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा