आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ३ नोव्हेंबर, २०२५

बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने वधू-वर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

मुंबई दि. २ (अधिराज्य) बौद्धजन पंचायत समिती संलग्न विवाह मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वधू-वर परिचय मेळावा समितीचे कार्यसम्राट कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांच्या अध्यक्षतेखाली विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई - १२ येथे दोनशे विवाहोच्छूक तरुण तरुणींनीच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
     सदर प्रसंगी महामानवांच्या प्रतिमांस पुष्पहार अर्पण करून लक्ष्मण भगत यांनी ज्योत प्रज्वलित करून मेळाव्याचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले, सरचिटणीस राजेश घाडगे यांनी आपल्या पहाडी व भारदस्त आवाजात लाघवी भाषेत व ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन करीत असताना बौद्धजन पंचायत समितीच्या ध्येय आणि धोरणांचा आढावा घेताना "सभापती आनंदराज आंबेडकर यांचे २०१० साली समितीत आगमन झाले तेव्हापासून बौद्धजन पंचायत समितीला वैभवशाली दिवस प्राप्त झाले, त्यांच्या संकल्पनेतून पंधरा उपसमित्या गठीत करण्यात आल्या त्या प्रत्येक समितीचे काम आज पारदर्शक पध्दतीने सुरू आहे त्यातीलच एक उपसमिती विवाह मंडळ होय यावर्षी ९६४ विवाहोच्छूक तरुण तरुणींनी विवाह मंडळात नावनोंदणी केली असून त्यातील १६७ विवाह संपन्न झाले, यापुढेही असेच पारदर्शक काम विवाह मंडळ व इतर उपसमित्या करीत राहतील" असे नमूद केले. तद्नंतर विवाह मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी प्रास्ताविक सादर करीत असताना "वधू-वर परिचय मेळावा ही केवळ एक औपचारिकता नसून आपल्या बौद्ध समाजातील दोन कुटुंबांचा, दोन मनांचा व दोन विचारांचा सुंदर संगम घडविणारा एक पवित्र उपक्रम आहे, सामाजिक दृष्टिकोन ठेवून मुला मुलींची माहिती घेऊन त्यांना एकमेकांना समजून घेण्याची संधी आपण उपलब्ध करून देत असताना जातपात, हुंडा, दागदागिने यांच्या ऐवजी शिक्षण, समजूतदारपणा, विचार, साम्यता याला महत्व देत आहोत हीच बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून विवाह मंडळाची भूमिका आहे" असे नमूद करत राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी विवाह मंडळाच्या आजवरच्या कामकाजाचा आढावा सादर केला. बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती विनोद मोरे, माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे यांनी ही मार्गदर्शनपर विचार मांडून उपस्थित विवाहोच्छूक मूला मुलींना व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन केले. उपकार्याध्यक्ष मनोहर सखाराम मोरे, एच. आर. पवार, अशोक कांबळे, चंद्रमनी तांबे, सचिव संदेश खैरे, सदानंद येलवे, तुळशीराम शिर्के, प्रमिलाताई मर्चंडे, अंजलीताई मोहिते, सायली साळवी आदी मान्यवर उपस्थित होते, सदर वधू-वर परिचय मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या बौद्धाचार्य मंगेश पवार गुरुजी, गौतम तांबे गुरुजी, प्रविण तांबे गुरुजी, रविराज शेळके, अशोक कदम, नरेश मोहिते, संजय मोहिते, राहूल कदम, मधुकर नरे, प्रदीप तांबे, व्यवस्थापन मंडळ व इतर कार्यकर्ते तसेच उपस्थित विवाहोच्छूक मूल, मूली त्यांचे पालक यांचे विवाह मंडळ सरचिटणीस गौतम जाधव यांनी आभार मानून अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रमाची सांगता केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने वधू-वर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

मुंबई दि. २ (अधिराज्य) बौद्धजन पंचायत समिती संलग्न विवाह मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वधू-वर परिचय मेळावा समितीचे कार्यसम्राट कार्याध्यक्ष...