मुंबई (सतिश पाटील ): निवडणुका या पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात आणि मतदार यादीतील गोंधळ दुरुस्त झालेच पाहिजेत याबद्दल आग्रही असणाऱ्या राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगा विरोधात मुंबईत, चर्चगेट येथे आज १ नोव्हेंबर २०२५ रोजी,' सत्याचा मोर्चा' काढला होता... यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना (उबाठा)पक्षप्रमुख श्री.उद्धव ठाकरे , मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शेकापचे जयंत पाटील आणि सर्व मान्यवर नेत्यांनी जमलेल्या नागरिकांना संबोधित केलं.मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आजचा मोर्चा हा राग व्यक्त करण्याचा ताकद दाखवण्याचा मुद्दा दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचा मोर्चा आहे.सत्ताधारी पक्षासह सर्वांना मतदारयादी विषयी तक्रार आहे तर निवडणुकांची घाई कुणासाठीअसा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.कल्याण, मुरबाडचे साडेचार हजार मतदार तिकडेही मतदान करतात आणि मलबार हिलमध्येही मतदान करतात. असे महाराष्ट्रात लाखो लोकं असतील.हा फार मोठा विषय आहे साधी गोष्ट नाही.मतदारयादी साफ करून पारदर्शक करा आणि त्यानंतरच निवडणूक घ्या.इव्हीएममध्ये गडबड असल्याचं मी २०१७ पासून सांगतोय... २३० जागा जिंकूनही महाराष्ट्रात सन्नाटा होता.कारण विधानसभेला निवडून येणाऱ्यांची सोय आधीच झाली होती. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात १७,२९,४५६ पैकी ६२,३७० दुबार मतदार आहेत. पुणे लोकसभेत १७,१२,२४२ पैकी १,०२,००२ दुबार मतदार आहेत.हीच परिस्थिती राज्यातल्या इतर सर्व मतदारसंघात आहे. त्याचे आज मी पुरावे घेऊन आलो आहे.गेली पाच वर्षे निवडणूक घेतलेली नसताना मतदारयादी दुरुस्तीसाठी अजून काही दिवस गेले तर असं काय नुकसान होणार आहे? पण जी माणसं मतदारयादीत घुसवली आहेत त्यांचं काय? मतदार यादीतील अशा प्रकारचे घोळ ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे आणि ही गोष्ट शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचली आहे.जेव्हा कधी निवडणुका होतील तेव्हा दुबार तिबार मतदान करायला आलेल्या लोकांचा चांगला समाचार घेऊन मग त्यांना पोलिसांच्या हवाली करा. या महाविराट मोर्चात मनसे, शिवसेना(उबाठा), ,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शेकाप आणि महाविकास आघाडीचे सर्व पक्षातील महत्वाचे नेते आणि पदाधिकारी काँग्रेस शरद पवार, शेकाप आणि महाविकास आघाडीचे सर्व पक्षातील महत्वाचे नेते आणि पदाधिकारी मान्यवरांनी उपथितीत राहून हा मोर्चा यशस्वी झाला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रमोद कर्नाड यांना ‘बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५’ जाहीर
नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख ) : बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व कवी प्रमोद कर्नाड यांना “बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अच...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा