आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, १८ ऑक्टोबर, २०२५

जे एस डब्ल्यू कंपनीत स्थानिकांच्या नोकर भरतीसाठी काराव ग्रामपंचायत सदस्यांच्या उपोषणाला यश ; सहा दिवसा नंतर मागण्यांना मान्यता

गडब ( अवंतिका म्हात्रे): पेण तालुक्यातील गडब काराव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी जेडब्ल्यू कंपनीने आयटीआय डिप्लोमा धारकांना नोकरीत सामावून घेण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य दिनेश म्हात्रे भाग्यश्री कडू वैशाली म्हात्रे दिपाली भोईर मुक्ता वाघमारे तसेच ग्रामस्थ राजु कडू
अंकुश वाघमारे यांचा समावेश होता.
      गेली सहा दिवस त्यांनी स्थानिक बेरोजगार मुलांसाठी उपोषण केले होते. स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी कंपनी प्रशासनाला देऊन त्यामध्ये कंपनीने मोठमोठे प्लान्ट उभे केले आहेत असे असताना स्थानिक मुलांना नोकरीत समाविष्ट करून घेणे क्रमप्राप्त असताना डावळून परप्रांतीयांना कंपनीत समाविष्ट करून घेतात . असे असताना स्थानिक नेते तसेच सरपंच व इतर सदस्य शांत राहून तमाशा बघत होते कंपनीला अशा परिस्थितीमध्ये हे सहकार्य म्हणावं लागेल . 
   सदर उपोषण करते गेली सहा दिवस आपल्या जीवाची पर्वा न करता स्थानिक मुलांच्या उज्वल भाविष्याचा विचार करून त्यांना नोकर भरतीत सामावून घेण्यासाठी जीवाचा अट्टाहास करताना दिसले .सहा दिवसात कंपनी प्रशासना सोबत तसेच तहसिलदार व प्रशासकीय अधिकारी यांच्या सोबत चर्चा करूनही मागण्या पूर्ण होत नव्हत्या.उपोषण कर्त्यांमध्ये एका आठ महिन्याच्या आईचा देखील समावेश होता अखेर आईला व तिच्या बाळाला सहा दिवसानंतर न्याय मिळाला .
     सदर उपोषणाला वेगवेगळ्या प्रकारे कलाटनी आरोप प्रत्यारोप स्वीकारावे लागले .  ग्रामस्थांनी देखील उपोषणकर्त्यांना खूप सहकार्य केल्याचे दिसले सदर उपोषणकर्त्या चे उपोषण उदात्य हेतूने केल्याचे दिसले . सदर मागण्या मंजूर झाल्या असून कंपनी प्रशासनाचे पीआरओ डीर्कटमेंट चे आत्माराम बेटकेकर यांनी लेखी निवेदन उपोषण कर्त्यांना देऊन यापुढेही त्यांना सहकार्य लाभेल याची सर्व ग्रामस्थां समोर हमी दिली .
        लवकरच दिलेल्या हमीची अमलबजावणी करण्यात येणार मसल्याचे सांगतिले . उपोषण करताना सन्माननीय सदस्य गावातील ग्रामस्थ हितचिंतक पत्रकार बंधू भगीनी व इतर कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य उपोषण करताना लाभल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले .
      सदर उपोषणादरम्यान युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हा अध्यक्षा म्हून
सौ अवंतिका म्हात्रे यांनी मुख्यमंत्री तथा जिल्हयातील सर्व प्रशासनांना निवेदन देऊन खुप मोलाच सहकार्य केल्याचे सांगितले.
    अनेकार्यकर्त्यानी येऊन सर्व उपोषण कर्त्यांन पाठींबा दर्शविला अखेर या सर्वबाबींची पडताळणी होताच उपोषणकर्त्यांच्या मागणीला समाधान कारक यश आल्याचे दिसले .अखेर कंपनी प्रशासन आपल्या शब्दाला किती जागणार याकडे सर्व गडबवासीय नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

स्वागत दिवाळी अंकाचे

स्वागत दिवाळी अंकाचे छायांकित दिवाळी अंक २०२५ (पोस्टमन) मराठी साहित्य क्षेत्रात प्रथमच "पोस्टमन" या विशेष व्यक्तिमत्त्...