आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, १८ ऑक्टोबर, २०२५

रायगड वासियांसाठी रायगड भूषण राष्ट्रीय नेमबाज किशन खारके यांनी दिली " सिल्वर मेडल " ची भेट..

गडब (अवंतिका म्हात्रे) : दिनांक 12 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर 2025 दरम्यान 40 वी रायफल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा शिवछत्रपती स्टेडियम महाळुंगे बालेवाडी पुणे येथे संपन्न झाली ह्या स्पर्धेत महाराष्ट्र मधून जवळ पास 1300 स्पर्धाकानी रायफल तसेच पिस्टल ह्या अश्या वेगवेगळ्या नेमबाजी प्रकारामध्ये सहभाग घेतला होता किशन खारके यांनी रायगड ज़िल्ह्याचे प्रतिनिधित्व करत 50 मिटर फ्री पिस्टल मास्टर मेन मधून नेत्रदीपक कामगिरी करत सिल्वर मेडल मिळवत सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला, पारितोषिक वितरणवेळी कॉमनवेल्थ मॅडलिस्ट, संघटनेच्या सेक्रेटरी शीला कानूगो मॅडम व अर्जुन अवॉर्ड विजेती अंजली भागवत मॅडम यांच्या हस्ते सिल्वर मेडल देवून गौरवण्यात आले.त्यांच्या यशाबद्दल सिद्धांत रायफल क्लब रायगड चे अध्यक्ष विजय खारकर,प्रितम पाटील अलंकार कोळी, महेश फुलोरे, अजिंक्य चौधरी,सुनील मढवी,राजु मुंबईकर,अविनाश भगत, समाधान घोपरकर, सुरज थळे, किरण मोहिते,प्रकाश दिसले, निलेश भगत, जगदीश पाटील, शैलेश पाटील, जयदास पाटील, संतोष फडके,अर्जुन पाटील व Asc batch 1997फ्रेंड्स, स्वीमिंग टायगर ग्रुप तसेच ग्रामस्थ नेरे व मित्र परिवार यांनी पुढील राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धे मध्ये सुयश संपादन करावे अश्या प्रकारे अभिनंदन करून पुढील राष्ट्रीय स्पर्धे करिता शुभेच्छा दिल्या तसेच युवाग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्हा अध्यक्षा सौ अवंतिका म्हात्रे यांनीही त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

स्वागत दिवाळी अंकाचे

स्वागत दिवाळी अंकाचे छायांकित दिवाळी अंक २०२५ (पोस्टमन) मराठी साहित्य क्षेत्रात प्रथमच "पोस्टमन" या विशेष व्यक्तिमत्त्...