आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १४ ऑक्टोबर, २०२५

आसनगाव येथे संपन्न झाले वैचारिक आंबेडकरी कवी संमेलन

आसनगाव (प्रतिक कांबळे )डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दसऱ्याच्या दिवशी धर्मांतर केले त्याचे औचित्य साधून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दि १२ ऑक्टोबर रोजी आंबेडकरी साहित्यिकांचे वैचारिक कवी संमेलन अगदी उत्साहात संपन्न झाले.
   सदर संमेलनासाठी मुंबई, ठाणे, नाशिक ,पुणे आणि आसपासच्या परिसरातील कवी कवयित्री यांनी आपली उपस्थिती राहुन आपल्या वैचारिक आंबेडकरी विद्रोही कवितेतून जनमानसात महापुरुषांचे विचार पोहचविले.संमेलानाचे आयोजन आसनगाव येथील स्नेहा रोकडे मेमोरियल फौंडेशन व जागर मानवतेच्या, महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आले होते.
     वैचारिक आंबेडकरी कवी संमेलनासाठी संमेलन अध्यक्षपदी प्रभाकर रोकडे (संपादक पुण्यजीत वार्ता), संमेलन उद्घाटक लताताई भरित (पतपेढी संचालक) तर संमेलन सुत्रसंचलन म्हणून रामबंधू आढांगळे (जेष्ठ कवी,लेखक) यांची नेमणूक करण्यात आली आहे.संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून अशोक सवाई (पत्रकार लेखक) व राजेश निकम (संघकारा) हे लाभले आहेत.
    संमेलनाचे आयोजक संजय रोकडे, बुद्धराज गवळी, प्रतिक कांबळे यांच्याशी बोलताना आयोजकांनी सांगितले की वैचारिक आंबेडकरी कवी संमेलन द्वारे आम्ही महापुरुषांचे विचार जनमानसात पोहचवण्याचे काम करत असतो‌ आणि यापुढेही करत राहणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

स्वागत दिवाळी अंकाचे

स्वागत दिवाळी अंकाचे छायांकित दिवाळी अंक २०२५ (पोस्टमन) मराठी साहित्य क्षेत्रात प्रथमच "पोस्टमन" या विशेष व्यक्तिमत्त्...