नवी मुबंई : लोक गौरव राष्ट्रीय एकात्मता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६ व्या वर्धापन दिनानिमित्त गौरव अतुलनीय कार्याचा राष्ट्रीय एकता सन्मान महासोहोळा, राष्ट्रीय प्राऊड लीडरशिप आयकॉन पुरस्कार व राज्यस्तरीय लोकसेवा आयोग गौरव पुरस्कार सोहोळा ची संकल्पना व नियोजन श्री एन.डी. खान व संयोजिका सौ सलमा एन.खान ह्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड गर्दीत वाशीच्या साहित्य मंदिर ह्या वातानुकूलित सभागृहात मोठ्या दिमाखात पार पडला समारंभाच्या अध्यक्षस्थानी ख्यातनाम जेष्ठ गझलकार तथा साहित्यिक ए के शेख,IRS माजी सह आयुक्त सेंट्रल एक्ससाईज अँड कस्टम अधिकारी श्री सुधाकर पाटील विशेष उपस्थिती वर्ल्ड रेकॉर्ड विजेता चित्रपट दिग्दर्शक श्री अल्ताफ शेख, उपसचिव सांस्कृतिक विभाग मंत्रालय श्री बाळासाहेब सावंत असे दिग्गज सोहोळ्याला आवर्जून उपस्थित राहिले. महाराष्ट्रातील विविध सामाजिक क्षेत्रातील निस्वार्थ समाजसेवा करणाऱ्या महानुभावाच्या कर्तृत्वाची जाण ठेवून त्यांचा यथोचित सन्मान करणे हे ह्या संस्थेचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो ह्या भावनेतून श्री. विरेंद्र म्हात्रे आपले विचार वर्तमान पत्रातून गेली अनेक वर्षे मांडत आहेत. लोकशाहीची बूज राखणे हि कर्तव्य भावना ठेवून त्यांच्या निस्वार्थ सेवेचा लोक गौरव एकात्मता परिषद च्या वतीने सन्माननीय श्री.विरेंद्र म्हात्रे ह्यांना पत्रकारितेत आपले अमूल्य योगदान दिल्यामुळे त्यांचा राज्यस्तरीय लोकसेवा गौरव पुरस्कार स्मृतिचिन्ह मान लेफ्टनंट कमांडर निलेश झोपे,सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई श्री रामचंद्र नागरगोजे व वर्ल्ड रेकॉर्ड विजेता चित्रपट दिग्दर्शक श्री अल्ताफ शेख यांच्या हस्ते आपुलकीने आदरपूर्वक सन्मानित करण्यात आले. सर्व उपस्थित सन्माननीय पुरस्कार विजेते श्रोते व दिग्गजांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.
सदर बातमी उद्याच्या अंकात प्रसिद्ध करावी हि नम्र विनंती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा