रायगड(केतन भोज): राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले मुंबई वरून महाडच्या दिशेने निजामपूर मार्गे त्यांच्या निवासस्थानकडे जात असताना,रात्री १ वाजेच्या सुमारस मौजे कांदलगाव तालुका माणगाव हद्दीमध्ये मुख्यरस्त्याच्या वळणावर एका बाईकस्वाराचा बाईक वरचा ताबा सुटल्याने बाईकचा अपघात होऊन रस्त्याच्या बाजूच्या झाडांमध्ये दोन बाईकस्वार जाऊन पडले होते.यावेळी हे दुचाकीस्वार जखमी अवस्थेत रस्त्याच्याकडेला मदतीच्या प्रतिक्षेत पडून होते.त्यावेळी मंत्री भरतशेठ गोगावले यांचा ताफा त्याठिकाणांहून जात असताना त्यांचे लक्ष मदतीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या त्या जखमी दुचाकीस्वारांवर गेले आणि त्यांनी लगेच आपल्या गाड्यांचा ताफा थांबवत मदत मागणाऱ्या जखमी दुचाकीस्वारांच्या मदतीला धावून जात आपल्या अंगरक्षकांच्या मदतीने झाडीत पडलेल्या अपघातग्रस्त दुचाकीस्वारांना तेथून काढून आपल्या ताफ्यातील वाहनांमध्ये बसवून स्वतः त्यांच्या सोबत रुग्णालय पर्यंत जाऊन ग्रामीण रुग्णालय माणगाव येथे उपचारासाठी दाखल केले.यावेळी ही घटना कळताच तत्काळ मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या पोहचण्या अगोदरच त्याठिकाणी रुग्णालया मध्ये युवा जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांनी रुग्णालयातील डॉक्टर तसेच कर्मचारी यांना दुचाकीस्वारांच्या या घडलेल्या घटनेबद्दल माहिती देत तत्काळ उपचार करण्यासाठी तयार राहण्यास सांगितले.यावेळी रुग्णालयातील डॉक्टर आणि सर्व कर्मचारी यांनी देखील तत्काळ मदत करून जखमी दुचाकीस्वारांवर उपचार करण्यास त्याठिकाणी सुरुवात केली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
गरिबांची दिवाळी गोड होण्यासाठी सामाजिक संस्था पुढे सरसावल्या
दरवर्षी दिवाळी आणि इतर सणांनिमित्त आनंदाचा शिधा रेशन दुकानांवर शासनाकडून देण्यात येतो, पण यंदा तो देण्या...
-
मुंबई (शांताराम गुडेकर ) भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी स...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा