मुबंई (सतिश पाटील): सराईत गुन्हेगार देवा पांडे (२२)व गोपी थेवर (२५)यांना पकडण्यात नवघर पोलीसांना यश आले त्यांनी गुन्हाची कबूली दिली आहे. ऑक्टोबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यात पहाटेच्या वेळी ही घटना घडली असून, एका व्यक्तीला लूटपाट करताना गंभीर मारहाण करण्यात आली व त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले.
मुलुंड पूर्व भागातील महात्मा फुले रोडवर, वीर सावरकर रुग्ण एका ऑटोरिक्शामध्ये बसलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्या व्यक्तीला अडवून तिचा मोबाइल फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. विरोध केल्याने त्यांच्यात झटापट झाली आणि त्या व्यक्तीला धारदार शस्त्रांनी मारहाण करण्यात आली.
पीडित व्यक्ती कामाला जात असता विल्सन बेरेटो(५२) हल्ला झाला, त्यांच्या चेहर्यावर १३ टाके घातले पुढील उपचार सायन रूग्णालय करण्यात आले.पुढील अशा घटना टाळण्यासाठी रात्रीच्या किंवा पहाटेच्या वेळी एकट्याने फिरणे टाळा आणि सार्वजनिक ठिकाणी सतर्क राहा.मुलुंड मध्ये गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा