आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०२५

अगस्त इंटरनॅशनल फौंडेशनच्या वतीने जिज्ञासा 2025-26 स्पर्धा आयोजन

मुंबई ( प्रतिनिधी):  अगस्त्य इंटरनॅशनल फाऊंडेशन वतीने जिज्ञासा 2025-26 ही स्पर्धा ऑनलाइन माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.एक दशकाहून अधिक काळ यशस्वीपणे राबवली गेलेली जिज्ञासा विदयार्थ्यांमधील समस्या सोडवण्याची कौशल्ये विकसित करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरली आहे. या वर्षीची स्पर्धा दोन विभागांमध्ये होणार आहे
1) विद्यार्थी गट– विद्यार्थी स्थानिक समस्या ओळखून त्या UN शाश्वत विकास उद्दिष्टांशी (SDGs) जोडून नाविन्यपूर्ण उपाय सुचवतील.
2)शिक्षक गट – TLM (Teaching Learning Material) बनवण्याची स्पर्धा
विज्ञान व गणित विषयातील महत्त्वाच्या संकल्पना स्पष्ट करणारे शिक्षण साहित्य (TLM) 
(डी. एड.बी. एड कॉलेज विद्यार्थी शिक्षक गटा तून भाग घेऊ शकतात)
स्पर्धेची वैशिष्ट्ये: स्पर्धा प्रादेशिक व राष्ट्रीय या दोन स्तरांवर होईल. प्रादेशिक स्तरावरील विजेते विद्यार्थी व शिक्षकांना राष्ट्रीय स्तरावर आपले प्रकल्प/साहित्य सादर करण्याची संधी मिळेल. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडवण्याची क्षमता, चिकित्सक विचारसरणी व जागतिक आव्हानांविषयी जागरूकता वाढवण्यास उपयुक्त ठरेल.शिक्षक व विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग हे या उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य ठरेल.ही स्पर्धा विनामूल्य असून जास्तीत जास्त शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांनी यात सहभागी व्हावे.
दिलेले कोड स्कॅन करून नोंदणी करावी. नोंदणी करण्याची अंतिम दिनांक 15 ऑक्टोबर आहे.
 नोंदणीसाठी संपर्क साधा: शुभांगी लोंढे -7588030314, प्रदीप कासुर्डे -7738436449

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गरिबांची दिवाळी गोड होण्यासाठी सामाजिक संस्था पुढे सरसावल्या

दरवर्षी दिवाळी आणि इतर सणांनिमित्त आनंदाचा शिधा रेशन दुकानांवर शासनाकडून देण्यात येतो, पण यंदा तो देण्या...