आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, ८ ऑक्टोबर, २०२५

आसनगाव मध्ये रंगणार वैचारिक आंबेडकरी कवी संमेलन

मुंबई ( प्रतिक कांबळे): धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने सर्वत्र वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होत असतात वेगवेगळ्या संघटनांच्या वतीने त्यातीलच एक आसनगाव मधील स्नेहा रोकडे मेमोरियल फौंडेशन व जागर मानवतेचा सोशल मिडिया ग्रुप यांच्या वतीने रविवार दि १२ रोजी न्यू स्टार्डस इंग्लिश हायस्कूल डॉ बाबासाहेब आंबेडकर आसनगाव येथे निमंत्रित कवीचे      रंगणार वैचारिक आंबेडकरी कवी संमेलन.
      सदर कवी संमेलनाचे आयोजन संजय रोकडे, बुद्धराज गवळी,प्रतिक कांबळे यांनी केले आहे.सदर संमेलनात संमेलन अध्यक्षपदी प्रभाकर रोकडे (संपादक पुण्यजीत वार्ता), संमेलन उद्घाटक लताताई भरित (पतपेढी संचालक) तर संमेलन सुत्रसंचलन म्हणून रामबंधू आढांगळे (जेष्ठ कवी,लेखक) यांची नेमणूक करण्यात आली आहे.संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून अशोक सवाई (पत्रकार लेखक) व राजेश निकम (संघकारा) हे लाभले आहेत.
      आयोजकांशी बोलताना आयोजकांनी सांगितले की वैचारिक आंबेडकरी कवी संमेलन द्वारे आम्ही महापुरुषांचे विचार जनमानसात पोहचवण्याचे काम करत असतो‌ आणि यापुढेही करत राहणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

श्री म्हसोबा देवस्थान उत्सवाचे आयोजन

मुंबई (पी.डी.पाटील): मेघवाडी, डॉ. एस्. एस्. राव रोड, लालबाग, मुंबई येथील श्री म्हसोबा मंदिर समिती व मेघवाडीतील रहिवाश्यांच्या वतीने गुरुवा...